भारत आणि पाकिस्तान या संघामधील खेळाडूंचे एकमेकांसोबत संबंध चांगले असले तरी जेव्हा ते क्रिकेटच्या मैदानावर आमने-सामने येतात तेव्हा वेगळेच वातावरण तयार होते. अशाच एका अविस्मरणीय खेळाचा अनुभव माझी भारतीय वेगवान गोलंदाज अशोक डिंडा यांनी शेअर केला आहे.
अशोक डिंडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून मंगळवारी(२ फेब्रुवारी) निवृत्ती घेतली असून दिंडाने भारताकडून तेरा वनडे आहे आणि ९ ट्वेंटी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने केले आहेत. त्याने वनडेमध्ये बारा तर ट्वेंटी-ट्वेंटीमध्ये १७ विकेट घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे आपल्या आयपीएलच्या कारकिर्दीत त्यानी दिल्ली डेअरडेव्हिल्स, कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघांचे प्रतिनिधित्व केलं होतं.
सामना म्हटलं तर हार-जीत असणारच आणि प्रत्येक जण आपल्या संघाचे प्रतिनिधित्व करत असताना आपल्या समोरचा संघ हा कोणत्या देशातला किंवा कोणत्या राज्यातला आहे, याचे त्याला जरा सुद्धा भान नसते. योग्य असे डावपेच खेळून त्याला आपल्या संघाला विजयी कसे करावे हेच त्या खेळाडूचे लक्ष्य असते. अशात जेव्हा भारत आणि पाकिस्तान संघात सामना होतो तेव्हा त्याला वेगळेच महत्त्व प्राप्त होते.
काय म्हणाला अशोक डिंडा
भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात खेळण्याबद्दल त्याने स्पोर्ट्सकिडाशी बोलताना सांगितलं की ‘लहानपणापासूनच मी भारत आणि पाकिस्तान यांच्यात जबरदस्त आणि रोमांचक सामने पाहिले होते. त्यानंतर मला पाकिस्तान विरुद्ध काही सामने खेळायला मिळाले. त्यांच्याविरुद्ध जेव्हा खेळायचो तेव्हा असे वाटायचं की आम्ही एखाद्या युद्धासाठी जात आहोत. भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यामधील मला सर्वात आवडणारी गोष्ट म्हणजे दोन्ही देशाचे खेळाडू सामन्यानंतर एकमेकांना भेटतात. पण जेव्हा मैदानात असतात तेव्हा ते असे वागतात जसं काही ते एकमेकांना कधी ओळखत सुद्धा नाहीत.’
मागील काही वर्षात भारत आणि पाकिस्तान संघात द्विपक्षीय क्रिकेट मालिका झालेल्या नाही. भारत आणि पाकिस्तान हे संघ गेल्या काही वर्षांत केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्येच आमने-सामने आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिले स्पष्टीकरण, म्हणाले…
“गिल असा क्रिकेटपटू आहे ज्याची येणाऱ्या काळात भरपूर चर्चा होईल”, भारतीय दिग्गजाची भविष्यवाणी





