आशिया चषक २०२२ चा पहिला सामना शनिवारी (२८ ऑगस्ट) अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांच्यात खेळला गेला. मोहम्मद नबी याच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान संघाने या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन केले आणि विजय मिळाला. या सामन्यात अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी प्रथम गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली. स्पर्धेची सुरुवात विजयाने केल्यानंतर कर्णधार नबीने खास प्रतिक्रिया देखील दिली.
श्रीलंकन संघाने विजयासाठी अफगाणिस्तानला अवघ्या १०६ धावांचे लक्ष्य दिले होते, जे त्यांनी ६१ चेंडूत गाठले. विजयानंतर अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबी (Mohammad Nabi) आनंदात दिसला. आशिया चषकातील अभियानाची सुरुवात अफगाणिस्तानने ८ विकेट्सने विजय मिळवून केली. सामन्यात मिळालेल्या विजयानंतर अफगाणिस्तानच्या कर्णधाराने संघातील खेळाडूंचे अप्रतिम गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी कौतुक केले. तसेच पुडच्या सामन्यात देखील अशाच प्रदर्शाची अपेक्षा व्यक्त केली.
सामना संपल्यानंतर नबी म्हणाला की, “प्रत्यक्षात संघातील खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले. खासकरून गोलंदाजांनी कमाल केली. जेव्हा आम्ही पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला, तेव्हा खेळाडूंनी खेळपट्टीचा चांगला उपयोग करून घेतला. आम्ही फक्त योग्य लाईनवर चेंडू टाकण्याची चर्चा करत होतो आणि आम्हाला थोडा स्विंग मिळाला तर तोदेखील आमच्या कामी आला असता. अशा पद्धतीच्या प्रदर्शनानंतर आम्हाला खूप आत्मविश्वास मिळाला आहे. आशा आहे की, आम्ही पुढच्या सामन्यात देखील चांगले प्रदर्शन करू.”
दरम्यान, आशिया चषकाच्या या पहिल्या सामन्यातून अफिगाणिस्तानने धमाकेदार सुरुवात केली. श्रीलंकन संघाला या सामन्यात ८ विकेट्सने मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानचा कर्णधार मोहम्मद नबीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो त्यांच्या गोलंदाजांनी अगदी योग्य ठरवला. श्रीलंकन संघ प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १०५ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानच्या सलामीवीर जोडीने वादळी खेळी केली. अवघ्या दोन विकेट्सच्या नुकसानावर आणि १०.१ षटकात त्यांनी हा सामना जिंकला. अफगाणिस्तानला पुढचा सामना ३० ऑगस्ट म्हणजेच मंगळवारी बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अल्टिमेट खो खो स्पर्धेत राजस्थान वॉरियर्सला नमवून चेन्नई क्विक गन्स पुन्हा विजयपथावर
खास सामन्याआधी विराटला आल्या आफ्रिकेतून शुभेच्छा! जिगरी यार एबी म्हणतोय…
आठ वर्षांपासून सुरू असलेल्या वर्चस्वाची मालिका टीम इंडिया सुरूच ठेवणार? वाचा ही आकडेवारी