एशिया कप (Asia Cup)२०२२ स्पर्धा युनायटेड अरब अमिराती येथे खेळली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना २७ ऑगस्टला यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात दुबई येथे खेळला जाणार आहे. तर भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध २८ ऑगस्टला होणार आहे. यामध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एका खेळाडूला संघात नाही घेतले तर ते संघासाठी नुकसानदायक ठरेल.
हा खेळाडू दुसरा कोणी नसून भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) हा आहे. सध्या भारतीय संघ झिम्बाब्वेच्या दौऱ्यावर आहे. तेथे सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत सॅमसन चमकदार कामगिरी करत आहे. अशातच त्याला बीसीसीआयने एशिया कपसाठी संघात जागा दिली नाही तर त्यांचा हा निर्णय संघाच्या विरोधात जाऊ शकतो.
एशिया कपसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. यामध्ये भारतीय संघ रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहेत. तसेच संघामध्ये अनेक अनुभवी खेळाडू उपस्थित आहेत. मात्र बीसीसीआयने एका महत्वाच्या खेळाडूकडे दुर्लक्ष करत मोठी चूक केली आहे. १५ जणांच्या संघामध्ये सॅमसनचा समावेश नाही. तसेच त्याचे नाव राखीव खेळाडूमध्येही नाही. तर सॅमसन झिम्बाब्वे विरुद्ध सुरू असलेल्या वनडे मालिकेत ग्लोव्ह्ज आणि बॅटने उत्तम खेळी करत आहे. त्यामुळे त्याला संघात न घेण्याचा बीसीसीआयचा निर्णय चूकला का, असे प्रश्न निर्माण होत आहेत.
सॅमसनने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ३९ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. त्याची ही खेळी भारतासाठी सामना जिंकण्यास उपयुक्त ठरली आहे. यामुळे भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
सॅमसनने २०२२मध्ये ५ टी२० डावांमध्ये ४४.७५च्या सरासरीने १७९ धावा केल्या आहेत. यामध्ये ७७ ही त्याची सर्वोच्च खेळी ठरली आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या सीएसकेने आधी बनवले कोट्याधीश, नंतर केले बाहेर; आता त्यानेच संघाला मिळवून दिलायं विजय
BREAKING। भारत पाकिस्ताननंतर आता बांग्लादेशचं टेन्शन वाढलं! ‘या’ दोन प्रमुख खेळाडूंना आशिया चषकापूर्वी झाली दुखापत
भारतीय संघाला मिळणार नवीन ‘युवराज’! धारदार गोलंदाजीबरोबरच विस्फोटक फलंदाजीतही माहीर