---Advertisement---

आशिया चषक खेळणाऱ्यांपैकी दोनच स्पिनर होणार टी२० विश्वचषक संघात सामील, जडेजासह ‘या’चे नाव आघाडीवर?

On: बुधवार, ऑगस्ट 10, 2022 3:58 PM
Ravindra Jadeja
---Advertisement---

आशिया कपचे सामने यूएईमध्ये होणार आहेत. तिथली खेळपट्टी फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे अष्टपैलू रवींद्र जडेजाशिवाय ३ खेळाडूंना फिरकीपटू म्हणून संधी देण्यात आली आहे.२७ ऑगस्टपासून ही स्पर्धा सुरू होणार आहे. टीम इंडिया आशिया कपसाठी सज्ज झाली आहे. टी-२० स्पर्धेसाठी १५ जणांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाशिवाय आर अश्विन, युझवेंद्र चहल आणि युवा गोलंदाज रवी बिश्नोई यांना संघात संधी देण्यात आली आहे.

यूएईची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे संघात ४ फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. प्रत्येकाला इथे चांगले काम करायला आवडेल. कारण या बहुराष्ट्रीय स्पर्धेतील कामगिरी टी-२० विश्वचषकासाठी महत्त्वाची ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ सहभागी होणार आहेत. टी-२० विश्वचषकाचे सामने ऑस्ट्रेलियात होणार आहेत. तिथली खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. अशा स्थितीत १५ सदस्यीय संघात केवळ ३ फिरकीपटू ठेवता येतील. जडेजा खेळणार हे निश्चित आहे. चहलची कामगिरीही उत्कृष्ट ठरली आहे. अशा स्थितीत बिश्नोई आणि अश्विन यांच्यात लढत होणार आहे.

अष्टपैलू आणि डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलचीही टी-२० विश्वचषकासाठी निवड होऊ शकते. आशिया चषकासाठी राखीव खेळाडू म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. भारताचा माजी निवडकर्ता के श्रीकांत आणि माजी यष्टीरक्षक किरण मोरे यांनी अश्विनच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित केले आहेत. आर अश्विन एक अनुभवी खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत ५४ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ६४ बळी घेतले आहेत. ८ धावांत ४ बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. अलीकडेच त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ टी-२० सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने दमदार गोलंदाजी करत ३ बळी घेतले.

शिवाय २१ वर्षीय युवा लेगस्पिनर रवी बिश्नोईने शानदार सुरुवात केली आहे. त्याने ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १५ विकेट घेतल्या आहेत. १६ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ टी-२० सामन्यांमध्ये उतरण्याची संधी मिळाली आणि त्याने प्राणघातक गोलंदाजी करताना ८ विकेट्स घेतल्या. तर दुसरीडे डावखुरा फिरकीपटू अक्षर पटेलबद्दल बोलायचे तर त्याने २५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २१ विकेट घेतल्या आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यात ५ बळी घेतले. १५ धावांत ३ बळी ही सर्वोत्तम कामगिरी आहे. तो फलंदाजीसह क्रमवारीत आक्रमक फलंदाजी करण्यासाठीही ओळखला जातो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

ASIA CUP: निवड होऊनही ‘या’ तीन भारतीय खेळाडूंना बसावं लागणार बाकावर! वाचा काय आहे कारण

आशिया कप जिंकण्यात टीम इंडिया शेर, मात्र वैयक्तिक कामगिरीत ‘या’ देशाचे खेळाडू सव्वाशेर

घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---