आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघ रविवारी (२८ ऑगस्ट) आमने सामने येणार आहेत. क्रिकेटच्या मैदानात जेव्हा कधी हे संघ एकमेकांविरुद्ध खेळतात, तेव्हा मैदानात दबावाचे वातावरण असते, यात कसलीही शंका नाहीये. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्यावरही या सामन्याचा अतिरिक्त दबाव असणार आहे. परंतु सामन्यापूर्वी त्याने हा दबाव कमी करण्यासाठी असे काही केले, ज्याची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून एक खास स्टोरी शेअर केली गेली आहे. स्टोरीमध्ये त्याने कारच्या पुढच्या सिटवर बसून सेल्फी शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “एक ड्राईव्ह आणि काहीशी सामान्य परिस्थिती! होय प्लीज.” विराट मागच्या मोठ्या काळापासून फॉर्ममध्ये नाहीये. तो डावाची सुरुवात चांगली करत असला, तरी मोठी खेळी मात्र करू शकला नाहीये. आता पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याच्यावर मोठी खेळी करण्याचा खूप जास्त दबाव असणार आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांसाठी रविवारी खेळला जाणारा हा सामना प्रतिष्ठेचा असेल. भारतीय संघ मागच्या वर्षी टी-२० विश्वचषकात पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध खेळताना पराभूत झाला होता. त्यापूर्वी पाकिस्तानने विश्वचषकात खेळताना भारताविरुद्ध एकही विजय मिळवला नव्हता. आता भारतीय संघ आशिया चषकात या पराभवाचा बदला घेण्याच्या प्रयत्नात असेल. मागच्या वर्षी दुबईमध्ये २४ ऑगस्ट रोजी हा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला होता. आता या संघांमध्ये पुन्हा एकदा याच मैदानावर लढत पाहायला मिळणार आहे.
विराट कोहली भारताचा प्रमुख खेळाडू असला, तरी मागच्या १००० दिवसांपेक्षा अधिक काळापासून त्याने एकही शतक केले नाहीये. नोव्हेंबर २०१९ मध्ये त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यात शेवटचे शतक केले होत. त्यानंतर चाहते त्याच्या पुढच्या शतकाची वाट पाहत आहेत, पण अद्याप त्यांची प्रतिक्षा संपलेली नाहीये. यादरम्यानच्या काळात विराटने अपेक्षित प्रदर्शन देखील केले नाहीये. आशिया चषाकापूर्वी विराटने मोठी विश्रांती घेतली असून, या स्पर्धेत तो चांगले प्रदर्शन करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
पाकिस्तानी चाहत्यासाठी रोहितने पार केली ‘लोहे की दीवार’, मिठी मारल्याचा व्हिडिओ व्हायरल
अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…
Asia Cup| श्रीलंका-अफगाणिस्तान संघात रंगणार ‘उद्घाटन सामना’, भारतात कुठे पाहता येईल लाईव्ह?