भारत विरुद्ध पाकिस्तान संघात आशिया चषक 2023 स्पर्धेचा तिसरा सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, 3 वाजता सुरुवात होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे खेळाडू चांगलेच फॉर्ममध्ये आहेत. अशात या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने बाबर आझम याच्याविषयी मोठे विधान केले आहे. चला तर, गंभीर काय म्हणालाय, जाणून घेऊयात…
गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला आशा आहे की, भारताचे तीन वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद शमी (Mohammad Shami) आणि मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) बाबर आझम (Babar Azam) याची चांगलीच परीक्षा घेतील. खरं तर, तब्बल 4 वर्षांनंतर भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघ 2 सप्टेंबर (IND vs PAK 2 September) रोजी वनडे सामन्यात आमने-सामने येणार आहेत.
बाबरची कठोर परीक्षा
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गंभीरला विचारले गेले की, बाबरने नेपाळविरुद्धच्या आपल्या खेळीतून भारताला संदेश दिला आहे का? या प्रश्नाचे उत्तर देताना गंभीर म्हणाला, “बाबर आझमला आता काहीही सिद्ध करण्याची गरज नाहीये. त्याने खेळलेल्या 104 सामन्यांमध्ये एक संदेश दिला आहे. जर तुम्ही 104 सामन्यात 19 शतके करू शकता, तर माझा विश्वास आहे, की तो सर्व प्रकारात अव्वल दोन किंवा तीन खेळाडूंमध्ये सामील आहे. त्यामुळे त्याला आता काहीच सिद्ध करण्याची गरज नाहीये.”
पुढे बोलताना सलामी फलंदाज म्हणाला, “मात्र, हा एक चांगला सामना होईल. भारतीय वेगवान गोलंदाजाविरुद्ध त्याची परीक्षा असेल. तुम्हाला दीर्घ काळानंतर भारतीय आक्रमण पाहायला मिळेल, जिथे तीन गोलंदाज (बुमराह, शमी आणि सिराज) बाबर आझमची चांगल्याप्रकारे परीक्षा घेऊ शकतात.”
आशिया चषक 2023मधील भारताचा पहिलाच सामना
भारतासाठी हा आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेतील पहिला सामना असणार आहे. तसेच, पाकिस्तानचा हा दुसरा सामना असेल. पाकिस्तानने उद्घाटनाच्या सामन्यात नेपाळला 238 धावांनी धोबीपछाड दिला होता. त्या सामन्यात पाकिस्तानी कर्णधार बाबर आझम याने तब्बल 151 धावांची शतकी खेळी साकारली होती. यापूर्वीही बाबरने चांगल्या खेळी साकारल्या आहेत. तरीही गंभीरच्या मते, त्याला भारतीय गोलंदाजांपुढे अडचणींचा सामना करावा लागेल.
पाकिस्तान विरुद्ध भारत (Pakistan vs India) संघातील हा सामना श्रीलंकेच्या कँडी येथील पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (asia cup 2023 ind vs pak former cricketer gautam gambhir says all 3 indian bowlers can test babar azam properly)
हेही वाचाच-
बिग ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघाची घोषणा, बदलून टाकला कर्णधार; वाचा
‘ईशानने ओपन करावे तर, विराटने 4 नंबरवर फलंदाजी करावी’, भारतीय माजी खेळाडूचे वक्तव्य






