आशिया चषक 2023 स्पर्धेतील बहुप्रतिक्षित भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला. स्पर्धेतील हा तिसरा सामना 2 सप्टेंबर रोजी कँडीच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडिअम येथे आयोजित केला गेला होता. या सामन्यात भारताने पाकिस्तान संघापुढे 267 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, सतत पडत असलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला. सामना रद्द झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान संघाला एक-एक गुण देण्यात आले. पाकिस्तान संघ 3 गुणांसह सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरला. यासोबतच बाबर आझम याच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघ आशिया चषक 2023 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनला. तसेच, भारतीय संघाने एक गुणासोबत गुणतालिकेतील खाते उघडले.
पाकिस्तान सुपर 4 फेरीत
आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना पाकिस्तान विरुद्ध नेपाळ (Pakistan vs Nepal) संघात खेळला गेला होता. हा सामना पाकिस्तान (Pakistan) संघाने 238 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. अशात आता त्यांचे 2 सामन्यातील 1 विजयासह 3 गुण झाले असून अ गटात पाकिस्तान सुपर 4 (Pakistan Supr 4) फेरीत पोहोचला आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट हा 4.760 इतका आहे. तसेच, भारताने एक गुणासह आपल्या गटात दुसरे स्थान पटकावले. भारतीय संघाला आपल्या दुसऱ्या सामन्यात नेपाळ संघाचा सामना करायचा आहे. भारतीय संघ 4 सप्टेंबर रोजी नेपाळविरुद्ध भिडेल. जर भारत आणि नेपाळ संघातील सामनाही अनिर्णित राहिला, तर भारतीय संघ 2 गुणांसह सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरेल.
ब गटात श्रीलंका पहिल्या स्थानी
ब गटात श्रीलंका संघाने खेळलेला एक सामना जिंकून 2 गुण मिळवले आहेत. श्रीलंका संघ आपल्या गटात अव्वलस्थानी आहे. तसेच, या गटात बांगलादेश आणि अफगाणिस्तान संघ रविवारी (दि. 3 सप्टेंबर) भिडतील. बांगलादेश संघाला श्रीलंकेने पहिल्या सामन्यात पराभवाचा धक्का दिला होता. सुपर 4मध्ये जाण्यासाठी त्यांना अफगाणिस्तानचा पराभव करावा लागेल.
हार्दिक पंड्या आणि ईशान किशन चमकले
पाकिस्तान विरुद्ध भारत (Pakistan vs India) सामन्याविषयी बोलायचं झालं, तर हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि ईशान किशन (Ishan Kishan) या जोडीने शाहीन आफ्रिदीच्या सुरुवातीच्या धक्क्यापासून भारतीय संघाचा डाव सावरला. मात्र, पावसाने पुन्हा अपेक्षांवर पाणी फेरले. भारतीय संघ 48.5 षटकात 266 धावांवर बाद झाला होता. ईशान किशनने कारकीर्दीतील पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात 81 चेंडूत 82 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. त्याने यावेळी 2 षटकार आणि 9 चौकारांचा पाऊस पाडला. तसेच, हार्दिक पंड्यानेही 1 षटकार आणि 7 चौकारांसह 90 चेंडूत 87 धावा केल्या. दोघांनीही पाचव्या विकेटसाठी 141 चेंडूत 138 धावांची महत्त्वाची भागीदारी रचत संघासाठी समाधानकारक धावसंख्या उभारली. (asia cup 2023 latest points table pakistan qualify for super 4 india earn 1 points ind vs pak called of match read )
हेही वाचा-
‘नवीन चेंडूने हेच करायचे होते’, रोहित-विराटची विकेट घेतल्यानंतर काय म्हणाला शाहीन आफ्रिदी
ASIA CUP: अखेर पावसाचाच झाला खेळ! भारत-पाकिस्तान सामना रद्द