---Advertisement---

INDvsPAK: अखेर पाकिस्तानी संघाला दिलाया! रोहितच्या रुपात भारताला पहिला झटका

On: रविवार, सप्टेंबर 4, 2022 8:00 PM
---Advertisement---

भारत विरु्दध पाकिस्तान महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. यावेळी केवळ एका आठवड्याच्या फरकात भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ एकमेकांना भिडत आहेत. यावेळी पाकिस्तानी संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या ओव्हरपासूनच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. मात्र, पावरप्लेच्या शेवटच्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर भारताला मोठा झटका बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा 16 चेंडूत 28 धावा करत बाद झाला आहे.

सामन्याच्या पहिल्या ओव्हरपासून कर्णधार रोहितने भारताला आक्रमक सुरुवात करून दिला. त्यानंतर संपूर्ण पावरप्लेमध्ये रोहितने आपली फटकेबाजी सुरू ठेवली. अखेर पावरप्लेच्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाकिस्तानी संघाला पहिली विकेट मिळाली. मात्र तोपर्यंत भारतीय संघाची धावसंख्या 54 धावांवर जाऊन पोहोचली होती. त्यामुळे कर्णधार रोहितने त्याचे काम पूर्ण केलेल असल्याची भावना क्रिकेट चाहत्यांमध्ये दिसून आली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: यावेळी पाकिस्तान करणार पलटवार? नाणेफेक जिंकत बाबरने घेतलाय गोलंदाजीचा निर्णय
INDvsPAK: मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या जड्डूची जागा घेण्यासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, वाचा प्लेइंग 11
‘देशी कोंबड्यांचे इजेक्शन द्या त्यांना!’ खेळाडूंच्या दुखापतींमुळे पाकिस्तानी दिग्गज संतापला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---