भारत विरुद्ध पाकिस्तान या आशिया चषकातील महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. यावेळी पाकिस्तानी संघाने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानी संघ सुरुवातीपासूनच सामन्यात दबदबा निर्माण करेल अशी आशा होती. मात्र भारताने अगदी पहिल्याच ओव्हरपासून पाकिस्तानी संघाला विशेष संकेत दिले आहेत.
पहिल्याच ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माने गोलंदाज नसीम शाहला बाहेर निघत एक जोरदार फटका लगावला. चेंडू थेट बाऊंड्रीजवळ जाऊन पडला आणि रोहित आणि टीम इंडियाला 4 धावा मिळाल्या. शिवाय पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर नसीमने बाऊंसर टाकण्याचा प्रयत्न केला त्याला रोहितने पूल शॉट मारत षटकार लगावला. या पहिल्याच ओव्हरमुळे संपूर्ण पाकिस्टानी संघाला रोहितने भारताच्या रणनितीची झलक दाखवली, त्यामुळे आता भारत संपूर्ण सामन्यात आक्रमक खेळ करेल अशी अपेक्षा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsPAK: मागच्या सामन्याचा हिरो ठरलेल्या जड्डूची जागा घेण्यासाठी ‘हा’ खेळाडू सज्ज, वाचा प्लेइंग 11
‘देशी कोंबड्यांचे इजेक्शन द्या त्यांना!’ खेळाडूंच्या दुखापतींमुळे पाकिस्तानी दिग्गज संतापला
साधेभोळे राहुल द्रविड S**y शब्द उच्चारायला लाजले! पत्रकार परिषदेतील व्हिडिओ तुफान व्हायरल