Asia Cup Women 2024:- महिला आशिया चषकासाठी भारतीय संघ श्रीलंकेत पोहोचला आहे. ही स्पर्धा 19 जुलैपासून सुरू होईल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ यावेळीही विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असेल. भारतीय संघानेच मागील आशिया चषक देखील जिंकण्यात यश मिळवले होते.
भारतीय संघानं आतापर्यंत 7 वेळा महिला आशिया चषक जिंकला आहे. यंदा टीम इंडिया आठव्यांदा स्पर्धी जिंकण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा ‘अ’ गटात समावेश आहे. भारताव्यतिरिक्त या गटात पाकिस्तान, संयुक्त अरब अमिराती (युएई) आणि नेपाळचा समावेश आहे. भारत आणि पाकिस्तान 19 जुलैला आमनेसामने येतील. यानंतर भारत आणि युएई संघ 21 जुलैला समोरासमोर येतील. तर भारत आणि नेपाळ यांच्यात 23 जुलै रोजी सामना होणार आहे. भारतीय संघ आपले सर्व सामने दांबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळणार आहे.
ब गटामध्ये यजमान श्रीलंकेसह बांगलादेश, मलेशिया व थायलंड यांचा समावेश आहे. स्पर्धेच्या उपांत्य लढती 26 जुलै रोजी खेळल्या जातील. तर अंतिम सामना 28 जुलै रोजी रंगणार आहे.
महिला आशिया चषकाचे आयोजन सर्वप्रथम 2004 मध्ये करण्यात आले होते. आतापर्यंत ही स्पर्धा 8 वेळा आयोजित करण्यात आली असून, ज्यामध्ये भारतीय संघानं विक्रमी 7 वेळा चषक उंचावण्यात यश मिळवले आहे. तर बांगलादेशचा संघ एकदा विजेता झाला आहे. विशेष म्हणजे पाकिस्तान आणि श्रीलंका या मजबूत मानल्या जाणाऱ्या संघांना देखील ही स्पर्धा जिंकण्यात यश आलेले नाही.
आशिया चषकासाठी भारतीय संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग ठाकूर, डी हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयंका पाटील आणि सजना सजीवन
राखीव खेळाडू – श्वेता सेहरावत, सायका इशाक, तनुजा कंवर आणि मेघना सिंग
महत्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास, जाणून घ्या आतापर्यंत किती पदकं जिंकली
IND VS SL: कर्णधार म्हणून सूर्याचीच हवा, तर हार्दिक पांड्या जवळपासही नाही, पाहा कॅप्टन म्हणून दोघांची कामगिरी
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या