पुणे | एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत दुहेरीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक व क्रोशियाच्या अॅन्ट पावीक यांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीच्या लढतीत बोस्नियाच्या टोमीस्लाव्ह ब्रेकीक याने क्रोशियाच्या अॅन्ट पावीकच्या साथीत स्पेनच्या पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास या जोडीचा टायब्रेकमध्ये 6-1, 7-6(7-5)असा पराभव करून विजेतेपद पटकावले. 1तास 13मिनिटे चाललेल्या या सामन्यात टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी सुरेख सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली. त्यांनंतर दोन्ही खेळाडूंनी सयंमपूर्ण खेळी करत पाचव्या गेममध्ये पुन्हा पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली.
7व्या गेममध्ये पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांनी 40-40असे गुण असताना डबल फॉल्ट केला व हा सेट 6-1 असा सहज जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही जोडींनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन केले व सामन्यात आपापल्या सर्व्हिस राखल्या. त्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 8व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची सर्व्हिस ब्रेक करून सामन्यात 5-3अशी आघाडी मिळवली. त्यांनंतर 12व्या गेममध्ये टोमीस्लाव्ह ब्रेकीक व अॅन्ट पावीक यांनी पेद्रो मार्टिनेझ व ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास यांची पुन्हा सर्व्हिस भेदली व सेट 7-6(7-5) असा जिंकून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
हि स्पर्धा जिंकल्यामुळे आम्हांला खूप आनंद झाला आहे. आम्ही गेली 7वर्ष दोघे सोबत खेळत आहोत. पहिला सेट सहज जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये आपल्या कामगिरीत सातत्य राखण्याचे आव्हान आमच्यासमोर होते. दुसऱ्या सेटमध्ये मार्टिनेझ व ऍड्रियन यांनी कडवी झुंज दिली. पण या आव्हानाला सामोरे जात आम्ही हा सेट टायब्रेकमध्ये जिंकला.
स्पर्धेतील विजेत्या जोडीला 3100डॉलर व 80 एटीपी गुण, तर उपविजेत्या जोडीला 1800डॉलर व 48एटीपी गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण केपीआयटीचे चेअरमन रवी पंडित, केपीआयटीचे व्यवस्थापकीय संचालक किशोर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक व एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, पीएमडीटीएचे खजिनदार कौस्तुभ शहा आणि
एटीपी सुपरवायझर रॉजिरिओ सांतोस
आदी मान्यवर उपस्थित होते.
दुहेरी गट- अंतिम फेरी
टोमीस्लाव्ह ब्रेकीक (बोस्निया)/ अॅन्ट पावीक(क्रोशिया) वि.वि.पेद्रो मार्टिनेझ(स्पेन)/ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन)6-1, 7-6(7-5).