---Advertisement---

ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ पराभूत झाल्याने ‘या’ खेळाडूच्या कुटुंबावर जातीवाचक टीका

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 6:52 PM
---Advertisement---

भारतीय महिला हॉकी संघाला टोकियो ऑलिंपिक २०२० स्पर्धेत पदक मिळवण्यात अपयश आले असले, तरी देखील त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचीच मनं जिंकली आहेत. कांस्य पदक मिळवण्यासाठी झालेल्या सामन्यात भारतीय संघाला ब्रिटन संघाने ३-४ ने पराभूत केले. परंतु उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाल्यानंतर, संघातील खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांसोबत गैरवर्तवणूक केल्याचा प्रकार घडला होता.

उपांत्यफेरीच्या सामन्यात भारतीय संघाला अर्जेंटिना संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू वंदना कटारिया हिच्या घरावर हल्ला करण्यात आला होता. तसेच तिच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ देखील करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यावरून समजते की, एखादा खेळाडू परदेशात जाऊन आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो. तरीसुद्धा त्यांच्या कुटुंबीयांना अशी वागणूक दिली जाते. परंतु खेळाडू हे सर्व विसरून देशासाठी पदक मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. इतका दबाव असताना देखील वंदना कटारियाने ब्रिटन विरुद्ध झालेल्या सामन्यात गोल केला होता. (Attack on Indian hockey team player Vandana Katariya after defeat in bronze medal match)

वडिलांचा मृत्यू होऊनही जाऊ शकली नाही घरी
वंदना कटारिया हिच्या वडिलांचे ३० मे रोजी निधन झाले होते. परंतु त्यावेळी ती नॅशनल कॅम्पमध्ये सराव करत होती. तिच्या वडिलांची ही इच्छा होती की, आपल्या मुलीला ऑलिंपिक स्पर्धेत पदक मिळावे. तिच्या वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी वंदना घरी आली नव्हती. ती वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिवस- रात्र मेहनत करत होती. वंदनाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर तिने एशियन गेम्स, एशिया कप, ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत पदक मिळवले आहे.

वंदना कटारियाने केले ४ गोल
वंदना कटारिया ही भारतीय संघाकडून ऑलिंपिक स्पर्धेत सर्वाधिक गोल करणारी महिला खेळाडू आहे. तिने एका हॅट्रिकसह ४ गोल केले होते. दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात तिने ३ गोल केले होते. याच कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला ४-३ ने विजय मिळवण्यात यश आले होते. यासह गुरजीत कौरने देखील ४ गोल केले होते.

महत्वाच्या बातम्या-

-ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा

-खेलरत्न पुरस्कारानंतर आता नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय स्टेडियमचे नाव बदलण्याची होतेय मागणी

-अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---