भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज कर्णधार सौरव गांगुली सध्या चर्चेत आहे. गांगुली चर्चेत असण्याचे कारण क्रिकेट नसून दुसरेच आहे. कही लोकांनी गांगुलीच्या मालकीची जमीनीवर कब्जा घेण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणात पोलिसात तक्रार दाखल गेली गेली आहे. साउथ 24 परगना याठिकणी गांगुलीची ही जमीन आहे. क्रिकेट अकादमीचे नाव पुढे करत ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. सुप्रियो भौमिक नावाच्या व्यक्तीवर ही मजीन बळकावण्याचा प्रयत्न केलाप्रकरणी आरोप लावले गेले आहेत.
सौरव गांगुली (Sourav Ganguly) याची सेक्रेटरी तान्य भट्टाचार्य हिने सुप्रियो भौमिक याच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीमध्ये असे म्हटले गेले आहे की, काही लोकांनी गांगुलीच्या नावावर असणारी ही जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान सिक्योरिटी गार्डने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यासोबतही मारहान करण्याचा केली गेली. त्यानंतर आरोपींसोबत जेव्हा फोनवर चर्चा केली गेली, तेव्हा समोरून धमकावण्याचा प्रयत्न केला गेला. तक्रार मिळताच आरोपीला महेशतला पोलीस स्टेशनमध्ये बोलावून तपास चौकशी केली गेली.
दरम्यान, गांगुली नुकत्याच पार पडलेल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात समालोचन करताना दिसला होता. भारतीय संघ या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर गांगुलीने मुख्य प्रशिक्षख राहुल द्रविडसोबत देखील चर्चा केली. गांगुलीकने द्रविडला अनेक महत्वाचे प्रश्न विचारले, जे भारताच्या पराभवासाठी कारणीभूत होते.
दरम्यान, मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात गांगुलीने भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयचे अध्यपद सोडले. बोर्डात अंतर्गत विरोध असल्यामुळे त्याला अध्यक्षपद सोडावे लागेल, अशाही बातम्या आल्या होत्या. सध्या गांगुली एक समालोचक म्हणून काम करत आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचीही महत्वाची जबाबदारी गांगुलीच्या खांद्यावर आहे, गांगुली सध्या दिल्ली संघाचा डायरेक्टर आहे. मात्र, मध्यंतरी अशाही बातम्या आल्या होत्या की, आगामी हंगामात दिल्ली संघाचे मुख्य प्रशिक्षकपद गांगुलीकडे येणार आहे. संघ व्यवस्थापन रिकी पाँटिंगसोबतचा करार आयपीएल 2023नंतर संपवणार, असे या बातम्यांमध्ये सांगितले गेले होते. मात्र, दिल्ली संघाचे मालक पार्थ जिंदाल यांनी या सर्व बातम्या चुकीच्या आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले. (Attempt to grab Sourav Ganguly’s land)
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन खेळाडूंना डिवचणे ‘बार्मी आर्मी’ला पडले महागात! वॉर्नरने ‘विराट स्टाईल’ने केली बोलती बंद!
शाब्बास पोरींनो! भारतीय मुलींनी जिंकला इमर्जिंग आशिया कप, फायनलमध्येही श्रेयंका चमकली