बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 20 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात विश्वचषक 2023 स्पर्धेतील 18वा सामना खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 62 धावांनी दारुण पराभव केला. हा पाकिस्तानचा विश्वचषकातील सलग दुसरा पराभव ठरला. मात्र, पाकिस्तानच्या पराभवापेक्षा जास्त चर्चा स्टेडिअममध्ये चाहता आणि पोलीस यांच्यात झालेल्या वादाची झाली. चला तर, संपूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊयात…
नेमकं काय घडलं?
झालं असं की, या सामन्यात पाकिस्तानी चाहता आणि पोलीस (Pakistan Fan And Cop) यांच्यात वाद झाला. हा चाहता सामन्यादरम्यान पाकिस्तान झिंदाबाद (Pakistan Zindabad) अशा घोषणा देत होता. त्यामुळे बंगळुरू पोलिसांनी त्याला असे करण्यापासून रोखले. ही घटना पाकिस्तानच्या डावादरम्यानची आहे. अशात त्यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरत आहे. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
‘मी पाकिस्तानातून आलोय’
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसते की, एक पोलीस कर्मचारी चाहत्याला पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देण्यापासून रोखत आहे. मात्र, तो चाहता पोलिसालाच उलट प्रश्न करत आहे. यामध्ये पाकिस्तानी चाहता म्हणताना दिसतोय की, “मी पाकिस्तानमधून आलो आहे आणि पाकिस्तान झिंदाबाद बोलणार नाही तर काय बोलणार? ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना आहे आणि मी पाकिस्तान झिंदाबाद बोलू शकत नाही का?”
Actually the policeman caught him coz he wasn’t chanting his slogan in Kannada 🤣 pic.twitter.com/K9r9aaVJzB
— Gabbar (@GabbbarSingh) October 20, 2023
काही वेळ तिथेच थांबल्यानंतर पोलीस कर्मचारी तिथून निघून जातो. मात्र, आता सोशल मीडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली आहे.
सामन्याचा आढावा
या सामन्यात पाकिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 9 विकेट्स गमावत 367 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तान संघाचा डाव 45.3 षटकात 305 धावांवर सर्वबाद झाला. यावेळी पाकिस्तानकडून फक्त दोघांनाच अर्धशतक करता आले. त्यात इमाम उल हक (70) आणि अब्दुल्ला शफीक (64) यांचा समावेश होता. (aus vs pak cop stops fan from chanting pakistan zindabad during world cup 2023 match 18 at bengaluru see video)
हेही वाचा-
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का! कॅप्टन बावुमा संघातून बाहेर, ‘हे’ आहे कारण
वानखेडेत ENG vs SA महामुकाबला! Toss जिंकत बटलरचा बॉलिंगचा निर्णय; एक दिग्गज In, तर दुसरा Out