ऑस्टरेलियाचा माजी कर्णधार स्टीव स्मिथ दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. स्मिथने गुरुवारी (5 जानेवारी) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर स्वतःचे 30 वे कसोटी शतक ठोकले. कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात स्मिथने ही खेळी केली असून माजी दिग्गज डॉन ब्रॅडमन यांचा मोठा विक्रम देखील मोडला.
डॉन ब्रॅडमन (Don Bradman) यांना कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जाते. यांनी या फॉरमॅटमध्ये 99.94 च्या सर्वोत्तम सरासरीने धावा केल्या आहेत. मात्र गुरुवारी स्टीव स्मिथ (Steve Smith) सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत ब्रॅडमन यांच्या पुढे गेला. ब्रॉडमन यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 29 शतके आहेत. तर स्मिथच्या नावावर आता 30 कसोटी शतकांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 30 शतके करणारा ब्रॅडमन 14 वा फलंदाज बनला आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियासाठी अशी कामगिरी करणाला तो तिसरा फलंदाज ठरला आहे.
स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या कसोटी सामन्यात 109 व्या षटकात स्वतःचे शतक पूर्ण केले. एनरिक नॉर्किया याच्या या षटकातील चौथ्या चेंडूवर स्मिथने चौकार शतक ठोकले आणि शतक पूर्ण केले. स्मिथने पहिल्या डावात 192 चेंडूत 104 धावा केल्या. केशव महाराजच्या चेंडूवर त्याने विकेट गमावली. स्मिथने या खेळीत 11 चौकार आणि 2 षटकार मारले. कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 4 बाद 475 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेसाठी एनरिक नॉर्कियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 2 विकेट्स घेतल्या. कागिसो रबाडा आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या फलंदाजंपैकी स्मिथ सर्वाधिक कसोटी शतके करणारा आहे. यादीत दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट आहे, ज्याने 28 शतके केले आहेत. विराट या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विराटने आतापर्यंत 27 शतके केली आहेत. डेविड वॉर्नर यादीत 25 शतकांसह चौथ्या क्रमांकावर आ हे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त शतकांची नोंद भारताचा महान फलंदाज सचिन तेंडूलकरच्या नावावर आहे. सचिनने त्याच्या कसोटी कारकिर्दीत एकूण 51 शतके केली आहेत. (aus vs sa Steve Smith broke Don Bradman’s record)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कर्णधार म्हणून हार्दिक कधीच हरत नाही! आधी जिंकली आयपीएल, आता चौथ्या देशाला देणार मात
एफसी गोवा घरच्या मैदानाचा फायदा उचलणार, हैदराबादला टक्कर देणार