धरमशाला येथे पार पडलेल्या विश्वचषक 2023 स्पर्धेतील 27व्या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडविरुद्ध शानदार विजय मिळवला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय झाला. हा ऑस्ट्रेलियाचा स्पर्धेतील सलग चौथा विजय ठरला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाला पॉईंट्स टेबलमध्येही चांगला फायदा झाला. त्यांनी चौथे स्थान पटकावले. या विजयानंतर कर्णधार पॅट कमिन्स प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करताना दहाच्या दहा विकेट्स गमावत 388 धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या 389 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ 9 विकेट्स गमावत 383 धावा करू शकला. त्यामुळे सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 5 धावांनी विजय (Australia won by 5 runs) झाला.
काय म्हणाला कमिन्स?
सामना जिंकल्यानंतर पॅट कमिन्स (Pat Cummins) म्हणाला, “हा खूपच शानदार सामना होता. विरोधी संघाने आम्हाला मजबूत टक्कर दिली. सलामी जोडी आणि खासकरून ट्रेविस हेडने खूप चांगली खेळी केली. आम्ही मधल्या षटकात चांगली गोलंदाजी केली. मात्र, आम्ही खूप धावाही खर्च केल्या. अखेरीस क्षेत्ररक्षकांनी स्वत:ला पूर्णपणे झोकून दिले. आमच्याकडे आता पुढील काही दिवसांचा ब्रेक आहे. याचा आम्ही पुरेपूर आनंद घेऊ.”
सामन्यातील विक्रम
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड (AUS vs NZ) संघांनी वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम बनवला. दोन्ही संघांनी मिळून तब्बल 771 धावा केल्या. सर्वात रोमांचक बाब ही होती की, या सामन्याचा निकाल अखेरच्या चेंडूवर लागला. सामन्यात चेंडू एकूण 97 वेळा सीमारेषेबाहेर गेला. विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेत असे दुसऱ्यांदा घडले. यापूर्वी दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका संघातील सामन्यात चेंडू एकूण 105 वेळा सीमारेषेबाहेर गेला होता. (aussie skipper pat cummins statement after win the match against new zealand aus vs nz world cup 2023 )
हेही वाचा-
‘वर्ल्डकप तर आम्हीच…’, ऑस्ट्रेलियाकडून 5 धावांनी हारल्यानंतर हुंकरला टॉम लॅथम; खेळाडूंचेही गायले गोडवे
ऑरेंज आर्मीची जय! नेदरलँड्सकडून बांगला टायगर्सची शिकार, बांगलादेश वर्ल्डकपमधून आऊट