नवी दिल्ली| आयपीएलच्या 13 व्या हंगामाला बोटांवर मोजण्याइतकेच दिवस शिल्लक आहेत आणि ऑस्ट्रेलिया व इंग्लंड वगळता सर्वजण आपापल्या संघात दाखल झाले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंबद्दल बोलताना, दोघांमध्ये तीन टी -20 सामन्यांची मालिका काल(८ सप्टेंबर) संपली आहे, तर आता वनडे मालिका सुरु होईल. ही मालिका संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू आयपीएलसाठी 17 सप्टेंबरला युएईला पोहोचू शकतात.
क्रिकबझच्या वृत्तानुसार, दोन्ही संघ इंग्लंडहून युएईला पोहोचल्यानंतर त्यांना सहा दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. यादरम्यान त्यांच्या तीन कोरोना चाचण्या होतील. त्यानंतरच 24 सप्टेंबर रोजी ते संबंधित गटात सामील होऊ शकतात. 24 सप्टेंबरपर्यंत सर्व संघ किमान एक तरी सामना खेळेल.
क्वारंटाईन ठेवण्याच्या कालावधीत नाही मिळणार सूट
दुसरीकडे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियन खेळाडू युएईला पोहोचल्यावर क्वारंटाईनच्या कालावधीत कोणतीही शिथिलता मिळणार नाही. खरं तर, आरसीबीसह काही फ्रँचायझींनी अशी मागणी केली होती की दोन्ही संघांचे खेळाडू आधीच बायो बबलमध्ये आहेत आणि तेही युएईहून चार्टर्ड विमानातून येतील. अशा परिस्थितीत त्यांना नियमांमधून सूट दीली जावी.
संघांच्या खेळाडूंबद्दल बोलताना राजस्थान रॉयल्समध्ये स्टीव्ह स्मिथ, जोस बटलर, जोफ्रा आर्चर, अॅन्ड्र्यू टाय असे महत्त्वाचे खेळाडू आहेत.
सनरायझर्स हैदराबाद येथे डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आहेत.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर मध्ये अॅरोन फिंच, जोशुआ फिलिप, अॅडम झाम्पा आणि मोईन अली यांच्यासह एकूण चार खेळाडू आहेत.
कोलकाता नाईट रायडर्सकडे पॅट कमिन्स, इयॉन मॉर्गन, टॉम बंटन, पंजाबमध्ये ग्लेन मॅक्सवेल, ख्रिस जॉर्डन हे अनुभवी खेळाडू आहेत. दिल्ली कॅपिटल्समध्ये स्टोइनिस आणि अॅलेक्स कॅरी आहेत. जोश हेजलवुड, सॅम करन सीएसके संघात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दोन मोठ्या पदांवर नेमणूक झाल्यामुळे ‘या’ दिग्गजावर कडाडून टीका
यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
ट्रेंडिंग लेख –
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे
तमिळनाडूचा मेकॅनिकल इंजिनीयर आयपीएलमध्ये करोडपती होतो तेव्हा…