शनिवारी (१९ मार्च) ऑकलंड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात आयसीसी महिला विश्वचषकातील १८ वा सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कर्णधार मेग लॅनिंगच्या शानदार ९७ धावांच्या खेळीच्या जोरावर ६ विकेट्सने सामना खिशात घातला. ऑस्ट्रेलियाचा हा विश्वचषकातील पाचवा सामना होता. या पाचही सामन्यात त्यांनी विजय मिळवला. भारताविरुद्धच्या विजयासह त्यांनी महिला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचे तिकीट मिळवले. यासोबतच त्यांच्या नावावर एका खास विक्रमाची नोंदही झाली आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता आणि भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. यावेळी भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकात ७ विकेट्स गमावत २७७ धावा केल्या. भारताने दिलेले हे भलेमोठे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाने ४९.३ षटकात ४ विकेट्स गमावत पूर्ण केले. यावेळी ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना कर्णधार मेग लॅनिंगने (Meg Lanning) सर्वाधिक धावा ठोकल्या. तिने १०७ चेंडूत ९७ धावांची खेळी केली. या धावा करताना तिने १३ चौकारांचा पाऊस पाडला. ऑस्ट्रेलियाने यासोबतच त्यांनी एक खास विक्रम केला.
महिला विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणाऱ्या संघामध्ये ऑस्ट्रेलिया अव्वलस्थानी पोहोचला आहे. भारताने दिलेले आव्हान ऑस्ट्रेलियाने ४ विकेट्सच्या बदल्यात २८० धावा करत पूर्ण केले. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पुन्हा ऑस्ट्रेलियाच आहे. ऑस्ट्रेलियाने २०१७ साली ब्रिस्टल येथे श्रीलंकेने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना सामना २ विकेट्स गमावत आणि २६२ धावा करत सामना जिंकला होता. त्यानंतर या यादीत तिसऱ्या स्थानी श्रीलंका संघ आहे. श्रीलंकेने २०१३ साली मुंबई येथे इंग्लंडविरुद्ध खेळत धावांचा पाठलाग करताना सामना ९ विकेट्स गमावत २४४ धावा करत जिंकला होता.
This team! ⭐️⭐️⭐️
They just keep producing the goods #CWC22 pic.twitter.com/dfBYbcNVkb
— cricket.com.au (@cricketcomau) March 19, 2022
आता महिला विश्वचषकातील १९वा सामना रविवारी (२० मार्च) ऑकलंड येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात खेळला जाणार आहे.
महिला विश्वचषकात सर्वाधिक धावांचा पाठलाग करताना विजय मिळवणारे संघ
२८०/४- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत (ऑकलंड, २०२२)
२६२/२- ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका (ब्रिस्टल, २०१७)
२४४/९- श्रीलंका विरुद्ध इंग्लंड (मुंबई, २०१३)
महत्त्वाच्या बातम्या-
महिला विश्वचषक: भारताला नमवत ऑस्ट्रेलियाचा सलग ५वा विजय, मिताली अन् कंपनीचा सेमीफायनचा मार्ग कठीण
कूक अन् कोहलीला मागे सोडत रूटचा नाद खुळा विक्रम; थेट गाठले अव्वल स्थान