ऑस्ट्रेलिया संघ चार सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात हे दोन बलाढ्य संघ आमने सामने असतील. कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये सुरू होणार आहे. पण मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला मोठा झटका बसला आहे. त्यांचा अष्टपैलू कॅमरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर होऊ शकतो. ऑस्ट्रेलियन संघाचा कर्णधार पॅट कमिन्स याने ग्रिनच्या दुखापतीविषयी अपडेट दिली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग डे (26 डिसेंबर) कसोटी सामना खेळला गेला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचा महत्वाचा खेळाडू कॅमरून ग्रीन (Cameron Green) याला दुखापत झाली. ग्रीनच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून अजूनही तो या दुखापतीतून पूर्णपणे सावरला नाहीये. ऑस्ट्रेलियाचा हा 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडू भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही? याविषयी मागच्या काही दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण आहे.
कॅमरून ग्रीन पहिल्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाही, असेच मागच्या काही दिवसांपासून सांगितले जात आहे. अशातच आता त्यांचा कर्णधार पॅट कमिन्सकडून याविषयी माहिती दिली गेली. कमिन्सच्या मते ग्रीन नागपूरमध्ये खेळेल की नाही, याविषयी अजूनही चित्र अस्पष्टच आहे. तो म्हणाल, “मला नाहीतेय की तो गोलंदाजी करू सकत नाहीये. पुढचा आठवडा त्याच्यासाठी महत्वाचा असेल. तो अजूनही खूपकाही करू शकला नाहीये.”
कमिन्स म्हणाला, “मला वाटते अशा प्रकारच्या दुखापती जेव्हा ठीक होऊ लागतात, तेव्हा त्यांना जास्त वेळ लागत नाही. आम्हाला आशा आहे की तो पुढच्या आठवड्यात ठीक होईल.” ग्रीन गुरुवारी (2 जानेवारी) नेट्समध्ये सराव करणार होता, पण याविषयी कर्णधार कमिन्सला जास्त काही माहिती नव्हती. “सराव सत्र कसे गेले ते मी पाहिले नाही. पण पुढचा आठवडा कसा जातो हे आपण पाहू. पुढचे काही दिवस महत्वाचे आहेत. संघाला अजूनही अपेक्षा आहेत, पण पुढे काय होते हे आपण पाहू.”
कोणत्या संघासाठी त्यांच्या अष्टपैलूला झालेली दुखापत म्हणजे मोठा धक्का असतो. अशात ग्रीनची दुखापत ऑस्ट्रेलिय संघाला देखील महागात पडू शकते. प्लेइंग इलेव्हनमधील संतुलन यामुळे बिघडू शकते आणि भारतीय संघ याचाच फायदा उचलत पहिल्या कसोटी पाहुण्या ऑस्ट्रेलियाला मात देऊ शकतो. ग्रीनच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाचे गोलंदाजी आक्रमन कमजोर होऊ शकते. दरम्यान, उभय संघांतील पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान, नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन (VCA) स्टेडियमवर खेळला जाईल. (Australia captain Pat Cummins hints that Cameron Greene could be out for the first Test against India)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी क्रिकेटमध्ये वाजणार आता रविचंद्रन अश्विनचाच डंका! बॉर्डर गावसकर ट्रॉफीत करणार ऐतिहासिक विक्रम
‘टी20त ईशानला ड्रॉप करून पृथ्वी शॉला खेळवा’, म्हणत विश्वविजेत्या भारतीय दिग्गजाने कारणही सांगितलं






