भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात तीन वनडे सामने, तीन टी20 सामने आणि चार कसोटी सामने खेळले जातील. या दौर्याची सुरुवात 27 नोव्हेंबरपासून सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या वनडे सामन्याने होईल. पण आता त्याआधीच यै या दौऱ्यातील सामन्यांवर कोरोनाचे संकट ओढवू लागले आहे. खरं तर दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचे सिडनी येथे करण्यात आलं स्थानांतर
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमुळे ऑस्ट्रेलियातील बर्याच राज्यांनी राज्यसीमा बंद केली आहे. भारताविरुद्ध होणाऱ्या मालिकेच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलियाने कसोटी कर्णधार टिम पेन, मॅथ्यू वेड, मार्नस लाब्यूशेन, ट्रॅव्हिस हेड, कॅमरॉन ग्रीन यांच्यासह ऑस्ट्रेलियाया अ संघाच्या खेळाडूंना विमानाने सिडनी येथे स्थानांतरित केले आहे.
आर्थिक नुकसान टाळण्यासाठी बोर्ड शोधत होता मार्ग
सोमवारी (16 नोव्हेंबर) पश्चिम ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड आणि तस्मानिया या राज्यांनी दक्षिण ऑस्ट्रेलियाला लागून असलेल्या सीमा बंद केल्या. त्यानंतर, ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या आणि कसोटी सामन्यांच्या संघाव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया अ संघाच्या खेळाडूंना मंगळवारी(17 नोव्हेंबर) सिडनी येथे आणण्याचा मार्ग क्रिकेट ऑस्ट्रेलिया शोधत होता, जेणेकरून प्रचंड आर्थिक नुकसान टाळता येईल.
…..सर्व परिस्थितीवर असणार लक्ष
चार्टर्ड फ्लाइटद्वारे खेळाडूंना सिडनीला पोहोचवण्यात आले. मालिका सुरळीतपणे आयोजित करण्यासाठी सर्व संभाव्य उपाय राबवण्याचा प्रयत्न करू असे ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक निवेदन जारी केले आहे आणि त्यामध्ये असा उल्लेख केला की, “आमची बायो-सिक्युरिटी आणि ऑपरेशन टीम परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. ते आगामी सामन्यांसाठी खेळाडू, प्रशिक्षक आणि संघातील सदस्यांना सुरक्षित ठेवण्याचे काम करत आहेत. मालिका सुरक्षितपणे आयोजित करण्यासाठी सर्व संभाव्य उपायांचा शोध घेतला जाईल.”
वनडे मालिकेनंतर टी20 आणि कसोटी मालिकेला होईल सुरुवात
वनडे मालिकेनंतर दोन्ही संघात टी20 मालिका होणार आहे आणि त्यानंतर 17 डिसेंबरला कसोटी मालिकेला सुरुवात होईल. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना ऍडिलेडमध्ये दिवस-रात्र खेळला जाईल. पण सध्या ऍडिलेडमध्ये कोरोना व्हायरसची मोठी लाट आली असल्याने हा सामना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात येण्याची शक्यता आहे. हा सामना मेलबर्न येथे होऊ शकतो. त्याआधी वनडे आणि टी20 सामने सिडनी आणि कॅनेबेरा येथे होणार आहेत.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यांचे वेळापत्रक
पहिला वनडे – २७ नोव्हेंबर – सिडनी
दुसरा वनडे – २९ नोव्हेंबर – सिडनी
तिसरा वनडे -०२ डिसेंबर – कॅनबेरा
पहिला टी२० – ०४ डिसेंबर – कॅनबेरा
दुसरा टी२० – ०६ डिसेंबर – सिडनी
तिसरा टी२० – ०८ डिसेंबर – सिडनी
पहिला कसोटी सामना – १७ डिसेंबर ते २१ डिसेंबर – ऍडिलेड
दुसरा कसोटी सामना – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्न
तिसरा कसोटी सामना – ०७ जानेवारी ते ११ जानेवारी – सिडनी
चौथा कसोटी सामना – १५ जानेवारी ते १९ जानेवारी – ब्रिस्बेन
महत्त्वाच्या बातम्या –
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कारणामुळे रोहित शर्मा टीम इंडियासह गेला नाही ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर
“…त्यामुळे भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियन संघ कसोटी मालिका सहज जिंकेल”, माजी कर्णधाराची भविष्यवाणी
ट्रेंडिंग लेख –
-विराट… ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यातून सोडलास तरीही आम्हाला तुझा अभिमान वाटतोय
ज्याच्या गोलंदाजीवर जखमी होत फिलीप ह्युजेस देवाघरी गेला, तोच गोलंदाज भारताविरुद्ध करतोय पदार्पण