भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना मुंबई येथे खेळला जात आहे. वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात जबरदस्त कामगिरी केली. सर्वच वेगवान गोलंदाजांनी आपली धार दाखवत ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ 188 धावांवर गुंडाळला. एकवेळ सुस्थितीत असताना ऑस्ट्रेलियाचा डाव अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. भारतीय गोलंदाजांच्या कसून गोलंदाजीचे उत्तर ऑस्ट्रेलियाच्या युवा फलंदाजांना देता आले नाही.
कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज संघर्ष करताना दिसलेले. वनडे मालिकेत चित्र काहीसे बदललेले असेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, यावेळी ही परिस्थिती जैसे थे राहिली. कसोटी मालिकेत चांगल्या लयीमध्ये दिसलेला हेड केवळ चार धावा काढू शकला. त्यानंतर भारतात खेळण्याचा भरपूर अनुभव असलेले स्टीव्ह स्मिथ व मिचेल मार्श हे भारतीय गोलंदाजांना काहीसे नडले. त्यांनी 72 धावांची भागीदारी केली. मार्श तर अक्षरशा भारतीय गोलंदाजांवर तुटून पडला होता. त्याने 65 चेंडूवर 10 चौकार व 5 षटकारांच्या मदतीने त्याने 81 धावांची वादळी खेळी केली. मार्श तिसऱ्या गड्याच्या रूपाने बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा धावफलक 19.4 षटकात 3 बाद 129 असा दिसत होता. धावसंख्येत आणखी दहा धावांची भर घालून मार्नस लॅब्युशेनही माघारी परतला.
प्रथमच भारतात वनडे मालिका खेळत असलेल्या जोस इंग्लिस व कॅमेरून ग्रीन या जोडीने आणखी 30 धावांची भर घातली. ऑस्ट्रेलिया 300 धावा करते का असे वाटत असताना, शमीने इंग्लिसची दांडी वाकवली. त्यानंतर ऑस्ट्रेलियावर इतकी खराब परिस्थिती आली की शमी व सिराज यांनी सलग तब्बल 24 निर्धाव चेंडू टाकून ऑस्ट्रेलियाचा डाव 188 वर संपवला. मागील 22 वर्षातील ऑस्ट्रेलियाची ही वनडेतील भारतातील सर्वात कमी धावसंख्या आहे.
ग्रीन 169 धावांवर बाद होणारा ऑस्ट्रेलियाचा पाचवा फलंदाज होता. पुढील 47 चेंडूंवर केवळ 19 धावा करत ऑस्ट्रेलियाने आपले सहा फलंदाज गमावले. भारतासाठी शमी व सिराज यांनी प्रत्येकी तीन बळी मिळवले. तर, जडेजाला दोन बळी घेण्यात यश आले. हार्दिक व शार्दुल यांनी देखील एक एक गडी बाद केला.
(Australia Downfall In Mumbai ODI Last 6 Wickets Goes In 19 Runs Courtesy Shami And Siraj)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जिममुळे क्रिकेटपटूंच्या दुखापती वाढल्या”, भारतीय दिग्गजाने दाखवून दिली सत्य परिस्थिती
बॅटमधून फ्लॉप, पण यष्टीमागे सुपरस्टार! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करण्यात राहुलचा सिंहाचा वाटा, पाहा Video