सिडनी। ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सध्या ४ सामन्यांची कसोटी मालिका सुरु असून या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशी बरोबरी झाली आहे. त्यानंतर आता तिसरा सामना सिडनी येथे नवीन वर्षात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी बुधवारी(३० डिसेंबर) क्रिकेट ऑस्ट्रेलियाने १८ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. या संघात ३ खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे.
ऑस्ट्रेलियाने अनुभवी सलामीवीर डेविड वॉर्नर आणि युवा विल पुकोव्हस्कीचा संघात समावेश केला आहे. याशिवाय सीन ऍबॉटचेही संघात पुनरागमन झाले आहे. हे तिघेही दुखापतीमुळे या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघात नव्हते. पण वॉर्नर त्याच्या दुखापतीतून बराच सावरला असून तिसऱ्या कसोटीसाठी अजून ७ दिवस बाकी असल्याने त्याला दुखापतीतून पूर्णपण तंदुरुस्त होण्यात पुरेसा वेळ मिळणार आहे.
वॉर्नरला भारताविरुद्ध वनडे मालिकेत खेळताना मांडीची दुखापत झाली होती. त्यामुळे तो टी२० मालिकेला आणि पहिल्या २ कसोटी सामन्यांना मुकला. पण आता तो तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकतो.
तसेच विल पुकोव्हस्कीला भारताविरुद्ध सराव सामना खेळताना डोक्याला चेंडू लागल्याने दुखापत झाली होती. त्यामुळे त्यालाही पहिल्या दोन कसोटी सामन्यात खेळता आले नाही. पण आता तो तिसऱ्या कसोटी सामन्यातून पदार्पण करु शकतो. याव्यतिरिक्त ऍबॉटही पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. त्यामुळे आता हे तिघेही गुरुवारी संघात सामील होतील.
बर्न्सला वगळले
ऑस्ट्रेलियन संघात ३ खेळाडूंचे पुनरागमन झाले असले तरी जो बर्न्सला या सामन्यातून वगळण्यात आले आहे. तो मागील काही काळापासून मोठ्या धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याचाच फटका त्याला बसला असून त्याला संघातील जागा गमवावी लागली आहे.
तिसरा कसोटी सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर ७ जानेवारीपासून खेळला जणार आहे.
असा आहे तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया संघ –
टिम पेन (कर्णधार), सीन ऍबॉट, पॅट कमिन्स, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवुड, ट्रॅव्हिस हेड, मोझेस हेन्रिक्स, मार्नस लॅब्यूशाने, नॅथन लायन, मायकेल नेसर, जेम्स पॅटिनसन, विल पुकोव्हस्की, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्विप्सन , मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर
महत्त्वाच्या बातम्या –
अटीतटीच्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
त्यादिवशी आलेला ‘तो’ मेसेज ठरला अजिंक्य रहाणेच्या आयुष्यातील टर्निंग पाँइंट!
जर रोहितचे तिसऱ्या कसोटीत पुनरागमन झाले तर ‘या’ खेळाडूला बसावे लागेल बाहेर