सध्याच्या क्रिकेटमध्ये पाहिले तर क्वचितच खेळाडू तिन्ही प्रकारांमध्ये खेळताना दिसतात. काही जण फिटनेसमुळे आता एकाच प्रकारचे क्रिकेट खेळताना दिसत आहेत. काहींनी तर दुखापतीने त्रस्त होऊन क्रिकेटच्या एका प्रकारातून निवृत्तीच घेतली. टी20 विश्वचषक (T20 World Cup) 2022ची स्पर्धा सुरू होण्याआधी अनेक संघाचे खेळाडू दुखापतग्रस्त झाले. त्यामध्ये भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याचाही समावेश होता. तो क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अधिक काळ खेळणार नाही, असे धक्कादायक विधान दिग्गज क्रिकेटपटूने केले आहे.
क्रिकेटविश्वातील महान वेगवान गोलंदाज जेफ थॉमसन (Jeff Thomson) यांनी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा त्याच्या कारकिर्दीत अधिक काळ क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळू शकणार नाही, जर त्याला आपल्या कारकिर्दीचा काळ मोठा करायचा असेल तर त्याने त्याला क्रिकेटच्या नेमक्या कोणत्या प्रकारात खेळायचे, हा निर्णय घेणे आवश्यक आहे.
थॉमसन म्हणाले, “बुमराह तिन्ही प्रकारामध्ये खेळतो म्हणून त्याचे शरीर अधिक थकते आणि तो दुखापतग्रस्त होतो. यामुळे त्याच्यावर आता योग्य निर्णय घेण्याची वेळ आली आहे. चाहत्यांना वाटते की त्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच खेळावे. त्याची वनडे आणि टी20मधील गोलंदाजी पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेडियममध्ये येतात. वनडेमध्ये 60 आणि टी20मध्ये 24 चेंडू टाकायचे असतात, यामुळे त्याने कोणत्या प्रकारात खेळावे हे ठरवावे.”
कसोटी क्रिकेटमध्ये एका दिवसात 15 षटके टाकावी लागतात. यामुळे तुम्हाला चांगलेच माहित आहे की क्रिकेटमध्ये अधिक काळ खेळण्यासाठी काय करावे. कोणताही वेगवान गोलंदाज 10 वर्षांपर्यंतच चांगली कामगिरी करण्यात सातत्य राखतो. ज्याप्रकारे मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचे विश्वचषक दर दोन वर्षांनी होतात त्यानुसार त्याला कमी लेखून चालणार नाही, असेही थॉमसन यांनी पुढे म्हटले आहे.
थॉमसन यांनी ऑस्ट्रेलियाकडून 1972-1985च्या दरम्यान खेळताना 51 कसोटीमध्ये 200 विकेट्स आणि 50 वनडेमध्ये 55 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच बुमराहने 2016मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने आतापर्यंत 30 कसोटीमध्ये 128, 72 वनडेमध्ये 121 आणि 60 आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 70 विकेट्स घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघ जिंकला, तरीही ‘या’ बाबतीत बाबर विराटच्या खालीच; स्वत:च ठरलाय कारणीभूत
नाणेफेकीचा कौल रोहितसेनेच्या पारड्यात, संघात हार्दिक असताना अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री