टी-२० विश्वचषक अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (१४ नोव्हेंबर) विश्वचषकाचा अंतिम सामना खेळाला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने उपांत्य सामने जिंकून अंतिम सामन्यातील आपले स्थान पक्के केले आहे. चाहत्यांना या अंतिम सामन्याची उत्सुकता लागली आहे. अशातच क्रिकेटप्रेमींसाठी एक आनंदाची आनंदाची बातमी समोर आली आहे. टी-२० विश्वचषकातील अंतिम सामन्यात पोहोचलेले हे दोन संघ स्पर्धेनंतरही पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत
टी-२० विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात न्यूझीलंडमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका आयोजित करण्यात आली आहे. ही टी-२० मालिका १७ मार्चपासून खेळली जाणार आहे. न्यूझीलंडच्या या दौऱ्यावर जाताना ऑस्ट्रेलियाच्या संघात काही महत्वाचे बदल दिसण्याची शक्यता आहे. या दौऱ्यासाठी डेविड वार्नर, स्टीव स्मिथ, पॅट कमिंस आणि मिशेल स्टार्क या खेळाडूंना वगळले जाऊ शकते. दरम्यान, हे दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहेत.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख निक हॉकले यांच्या मते हा दौरा कोविड १९ मुळे झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंड क्रिकेटसाठी सहकार्य ठरणार आहे. हॉकवे यावेळी ‘क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू’ या माध्यमाशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “न्यूझीलंडच्या उन्हाळ्यातील कार्यक्रमावर महामारीचा मोठी परिणाम पडला होता आणि मला आनंद आहे की, आपण या टी-२० आंतरराष्ट्रीय दौऱ्याच्या माध्यमातून आपल्या जवळच्या शेजाऱ्यांचे सहकार्य करू शकतो. ”
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने या आठवड्याच्या सुरुवातीला टी-२० विश्वचषकादरम्यान पाकिस्तान दौऱ्याची पुष्टी केली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांसाठी हा दौरा करणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ मागच्या बऱ्याच काळापासून पाकिस्तान दौऱ्यावर आलेला नाही. ऑस्ट्रेलियाने त्यांचा शेवटचा पाकिस्तान दौरा जवळपास २४ वर्षांपूर्वी केला होता.
ऑस्ट्रेलियाच्या न्यूझीलंड दौऱ्यावरील पहिला टी२० सामना १७ मार्चला आहे. त्यानंतर दुसरा सामना १८ मार्च आणि तिसरा सामना २० मार्च रोजी खेळला जाणार आहे.
‘टी२० विश्वचषकाच्या संघ निवडीत माझा आणि विराटचा सहभाग नव्हताच’, शास्त्रींचा धक्कादायक खुलासा
पुन्हा तुटणार विलियम्सन आणि संघाचे स्वप्न? ‘अशी’ राहिलीय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडची आमने सामने कामगिरी
टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी