---Advertisement---

अफलातून! हवेत डाइव्ह मारत विराट कोहलीने घेतला एकाच हातात झेल, पाहा Video

On: सोमवार, नोव्हेंबर 16, 2020 8:11 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला जगातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांमध्ये गणले जाते. त्याने आपल्या क्षेत्ररक्षणाने सर्वांनाच चकित केले आहे. सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी सिडनी येथे आहे. तिथे ते क्वारंटाईन होण्याबरोबरच सरावही करत आहेत. यादरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने इंस्टाग्रामवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ कर्णधार विराटच्या क्षेत्ररक्षणाचा जलवा पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओत कसोटीतज्ज्ञ म्हणून ओळखला जाणारा चेतेश्वर पुजारा आणि सर्व क्रिकेटमधील संघाचा कर्णधार विराट कोहली लाल चेंडूने झेल घेताना दिसत आहे. सोबतच वनडे आणि टी२० संघाचा भाग असलेल्या मनीष पांडेचाही समावेश आहे. तो धावताना आणि पांढऱ्या चेंडून उंचावरील झेल घेताना दिसत आहे. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत.

https://www.instagram.com/p/CHmxGXoAwNL/?utm_source=ig_web_copy_link

पुजाराव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, उमेश यादव, आर अश्विन आणि मोहम्मद सिराजही भारतीय कसोटी संघाचा भाग आहेत. रोहित शर्मालादेखील कसोटी संघात सामील केले आहे. परंतु तो सध्या भारतात आहे. आणि दुखापतीवर उपचार घेत आहे.

रोहित आपल्या दुखापतींवर उपचार घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारतीय संघ सध्या ६९ दिवसांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यात ३ वनडे, ३ आंतरराष्ट्रीय टी२० आणि ४ कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात सिडनी येथे २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिकेने होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण

“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

आर्चर, बुमराह आणि कमिन्सपेक्षा ‘या’ गोलंदाजाविरुद्ध खेळणे आव्हानात्मक, आयपीएल गाजवणाऱ्या पडिक्कलचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

भारतीय प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालेले ३ ऑस्ट्रेलियन क्रिकेटर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---