---Advertisement---

पहिल्या टी२० सामन्यात अशी असेल टीम इंडिया

On: सोमवार, नोव्हेंबर 19, 2018 1:17 PM
---Advertisement---

ब्रिस्बेन |  भारत विरुद्ध आॅस्ट्रेलियामधील ३ सामन्यांच्या टी२० मालिकेला परवा अर्थात २१ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. ११ नोव्हेंबरला विंडीजविरुद्ध तिसरा टी२० सामना खेळल्यावर टीम इंडिया पहिल्यांदाच टी२० सामना खेळणार आहे.

त्या सामन्यात खेळलेल्या ८-९ खेळाडूंनाच या सामन्यात संधी मिळण्याची संधी आहे. यात सलामीला रोहित शर्मा आणि शिखर धवन जवळपास निश्चित आहेत. भारताचे हे सलामीवीर मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्या चांगली कामगिरी करत आहेत.

मधल्या फळीत विराटच्या परतण्यामुळे मनिष पांडेला संघाबाहेर बसावे लागु शकते. मधल्या फळीची भिस्त विराटसह केएल राहुल, दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतवर असेल. कार्तिक या सामन्यात यष्टीरक्षण करताना दिसू शकतो. या मालिकेसाठी धोनीला टी२० मालिकेतून प्रथमच वगळण्यात आले आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून कृणाल पंड्याला संधी दिली जाऊ शकते. कृणालने भारताकडून तीन टी२० सामने खेळले आहेत. तो गेल्या सामन्यातही संघात होता.

गोलंदाजीची धूरा भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि जसप्रीत बुमराह या तीन वेगवान गोलंदाजांवर असेल तर फिरकीपटू म्हणुन कुलदीप यादवला संधी मिळू शकते.

श्रेयस अय्यर, मनीष पांडे, युझवेंद्र चहल, वाशिंग्टन सुंदर आणि उमेश यादवला मात्र या सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमीच आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!

असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!

महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment