ऑस्ट्रेलिया संघाने एॅडलेड येथे पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघावर 8 विजय मिळवला. त्याचबरोबर या मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार टीम पेनने प्रतिक्रिया दिली. टीम पेन म्हणाला, “मी विचार सुद्धा केला नव्हता की इतक्या लवकर होईल. परंतु गोलंदाजांमध्ये क्षमता आहे आणि ते असे करण्यात सक्षम आहेत.” पेनने मान्य केली की दोन्ही संघाचे गोलंदाज दमदार आहेत.
सामन्यानंतर टीम पेन म्हणाला, “मी सकाळीच म्हणालो होतो की, दोन्ही संघाच्या गोलंदाजांमध्ये लवकर गडी बाद करण्याची क्षमता आहे. परंतु इतक्या जलद होईल, असा विचार केला नव्हता.” टीम पेन पुढे म्हणाला, “आमच्या गोलंदाजाने रणनिती योग्य प्रकारे लागू करणे आणि अशी विकेट असेल, तर प्रदर्शन असेच होणार.” टीम पेनने ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे श्रेय त्यांच्या गोलंदाजांना दिले.
टीम पेननेही केली चमकदार कामगिरी
एॅडलेड कसोटी सामन्यात पहिल्या डावात जेव्हा ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत होता, तेव्हा पेनने चमकदार फलंदाजी करून आपल्या संघासाठी धावा जोडल्या. ज्या नंतर संघासाठी उपयुक्त ठरल्या. पेनने एक बाजू लावून धरताना महत्त्वपूर्ण अशी 73 धावांची नाबाद खेळी साकारली. या कारणामुळे भारतीय संघाची धावांची आघाडी कमी झाली आणि ऑस्ट्रेलिया संघाला याचा फायदा झाला.
उल्लेखनीय म्हणजे कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया गोलंदाज पूर्णपणे भारतीय फलंदाजांवर वरचढ ठरले. जोश हेझलवूड आणि पॅट कमिनस यांनी अनुक्रमे 5 आणि 4 गडी बाद केले. या दोघांनी भारतीय संघाला फक्त 36 धावामध्ये गुंडाळले. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने 92 धावांचे लक्ष फक्त 2 फलंदाज गमावून पूर्ण केले आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. याबरोबरच मालिकेत 1-0 या फरकाने आघाडी घेतली.
संबधित बातम्या:
– AUS vs IND Test Live : बर्न्सच्या अर्धशतकी खेळीने कांगारूचा भारतावर ८ विकेट्सने विजय; १-० ने घेतली आघाडी
– बिग ब्रेकिंग.! भारतीय संघाला मोठा धक्का, मोहम्मद शमी कसोटी मालिकेतून बाहेर
– अब जिंदा रेहने के लिये बचा ही क्या है! टीम इंडियाच्या वाईट प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस