fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलन घेतली या टी२० मालिकेची विकेट, आता अनिश्चित काळासाठी ढकलली पुढे

Australia vs West Indies T20I Series postponed

August 6, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

मेलबर्न। क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मंगळवारी (४ ऑगस्ट) म्हटले आहे की, त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ऑक्टोबर महिन्यात होणारी ३ सामन्यांची टी२० मालिका स्थगित केली आहे. टी२० सामन्यांचे आयोजन टाऊन्सविल, केर्न्स आणि गोल्ड कोस्टमध्ये अनुक्रमे ४, ६ आणि ९ ऑक्टोबर रोजी होणार होते. ही मालिका टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी आयोजित केली जात होती. परंतु या प्रतिष्ठित स्पर्धेला मागील महिन्यात कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आले. त्यानंतर दोन्ही देशांच्या बोर्डांनी टी२० मालिकाही स्थगित करण्याचा निर्णय घेतला.क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ट्वीट करत लिहिले, “ऑक्टोबर महिन्यात क्वीन्सलँडमध्ये होणारी वेस्ट इंडिजविरुद्धची टी२० मालिका स्थगित करण्यास आम्ही तयार आहोत. ही मालिका आयसीसी टी२० विश्वचषकाच्या तयारीसाठी होती. आता याचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये २०२१ किंवा २०२२ मध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकापूर्वी केले जाईल.”

पुढील महिन्यात म्हणजेच १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरदरम्यान आयोजन होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत दोन्ही देशांचे अव्वल खेळाडू भाग घेतील. याव्यतिरिक्त रविवारपासून सुरु होणारी ऑस्ट्रेलियाची झिंबाब्वेविरुद्धची वनडे मालिकाही स्थगित करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियाला आता सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला इंग्लंडचा मर्यादित षटकांचा दौरा करायचा आहे. परंतु मालिकेचे आयोजन होते की नाही हे पहावे लागेल. मागील आठवड्यात दक्षिण आफ्रिकेने सप्टेंबर महिन्यात होणारा वेस्ट इंडिजचा दौरा अनिश्चित काळासाठी स्थगित केला होता. कारण त्यांचे खेळाडू आयपीएल स्पर्धेत व्यस्त असणार आहेत. वेस्ट इंडिजचा संघ सप्टेंबर महिन्यात २ कसोटी किंवा ५ आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद स्विकारण्याची अपेक्षा करत होता.

महत्त्वाच्या बातम्या –

-आईच्या मदतीने सुरु झाली होती डिविलियर्सची प्रेमकहानी, भारतातच केले होते प्रपोज

-एक फलंदाज तर दुसरा अष्टपैलू, २ रिटायर क्रिकेटर रोहितला हवे आहेत मुंबई इंडियन्समध्ये

-टीम इंडिया आता वापरणार नवी जर्सी, बीसीसीआयने काढले नविन टेंडर

ट्रेंडिंग लेख –

-आयपीएल २०२०- या ५ सलामी जोड्यांवर असेल सर्वांची नजर

-वाढदिवस विशेष: शतकातील सर्वोत्तम झेल घेणारा वेसबर्ट ड्रेक्स

-गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद


Previous Post

वादळी वाऱ्यामुळे नवी मुंबईच्या आयकॉनीक डीवाय पाटील स्टेडियमचे मोठे नुकसान

Next Post

आयसीसी वनडे क्रमवारीत विराटचे अव्वल स्थान कायम, तर रोहितच्या दुसऱ्या स्थानाला…

Related Posts

Photo Courtesy: Twitter/ICC
IPL

गोलंदाज करत असलेल्या ‘या’ चूकीवर भडकले सुनील गावसकर; म्हणाले…

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

“आरसीबीमध्ये सामील झालेल्या पहिल्या दिवसापासून वाटते की मी माझ्या घरात आहे”, दिग्गज खेळाडूची प्रतिक्रिया 

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

पहिल्याच षटकात गोलंदाजी करण्याची ‘त्याला’ नव्हती कल्पना, वॉर्नरने योजनेमागील सांगितले अजब कारण

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
टॉप बातम्या

सचिन जेव्हा शारजात शानदार खेळला तेव्हा त्याचा सीव्ही कसा होता?

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

आठ वर्षात जमले नाही ते धोनीने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात केले, पाहा चक्रावून टाकणार रेकॉर्ड

April 22, 2021
Next Post

आयसीसी वनडे क्रमवारीत विराटचे अव्वल स्थान कायम, तर रोहितच्या दुसऱ्या स्थानाला...

४ पर्यांयांपैकी अ‍ॅडम गिलख्रिस्टने या क्रिकेटरला म्हटले जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक

डीजे ब्राव्हो गाणे पुन्हा वाजले, परंतू यावेळी कारण होते वेगळे

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.