---Advertisement---

वनडे मालिकेवर ऑस्ट्रेलियाची मोहोर, वेस्ट इंडिजचा तिसऱ्या वनडेत ६ विकेट्स केला पराभव

On: बुधवार, जुलै 28, 2021 12:53 AM
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडिज दौरा नुकताच संपला आहे. या दौऱ्यातील वनडे मालिकेतील अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सहा विकेट्स राखून वेस्ट इंडिजचा पराभव केला. याबरोबरच वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात वेस्टइंडीजने प्रथम फलंदाजी करत 45.1 षटकांमध्ये सर्वबाद 152 धावाच केल्या. तर ऑस्ट्रेलियाने 153 धावांचा पाठलाग 30.3 षटकामध्ये केवळ 4 विकेट्ल गमावत सहज पार केला. या सामन्यात एश्टन एगरला त्याच्या अष्टपैलू खेळासाठी सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच मिचल स्टार्कला तीन सामन्यात 11 विकेट्स घेतल्याबद्दल मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्टइंडीजचा कर्णधार किरॉन पोलार्डने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा घेतलेला निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. वेस्ट इंडिजचा संघ एका ठराविक अंतराने विकेट्स गमावत गेला आणि संघ मोठे आव्हान देऊ शकला नाही. 75 धावा होईपर्यंत अर्ध्याहून अधिक खेळाडू बाद झाले होते.

वेस्ट इंडिजकडून सलामीवीर एविन लुईस व्यतिरिक्त कोणता खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. शाई होप 14, शिमरोन हेटमायार 6, ब्रावो 18, निकोलस पूरन 3 आणि कर्णधार कीरॉन पोलार्ड फक्त 11 धावा करू शकला. लुईसने 55 धावांची अर्धशतकी खेळी केली.  ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने सर्वात जास्त 3 विकेट्स घेतल्या. जोश हजलेवुड, एश्टन एगर आणि ऍडम झम्पाने प्रत्येकी विकेट्स घेतल्या.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाची सुरुवात समाधानकारक नव्हती. त्यांचे सलामीवीर जोश फिलीप आणि मोझेस हन्रीक्सने अनुक्रमे 10 आणि 1 धावा केल्या. मधल्या फळीतील एलेक्स कॅरी आणि मिशेल मार्शने अनुक्रमे 35 आणि 29 धावा केल्या. पण मॅथ्यू वेडने ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक झळकावले. मॅथ्यू वेडने 52 चेंडूत 51 धावा केल्या. तसेच एश्टन एगरने नाबाद 19 धावा केल्या आणि ऑस्ट्रेलियाला 30.3 षटकामध्ये विजय मिळवून दिला.

वेस्टइंडीज संघाकडून शेल्डन कॉट्रेल, अकिल हुसेन, अल्झारी जोसेफ आणि हेडन वॉल्श यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

महत्त्वाच्या बातम्या – 

अरर! चक्क बेन स्टोक्सकडून झाली चूक, बाऊंड्री लाईनवर झेलही सुटला अन् संघाने सामनाही गमावला

अवघ्या १९ वर्षीय दीप्तिच्या मदतीसाठी धावला ‘मास्टर ब्लास्टर’, डॉक्टर बनण्यासाठी करणार मदत

कृणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची झाली आरटी-पीसीआर टेस्ट, पाहा काय आला अहवाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---