नुकतीच ऑस्ट्रेलिया आणि स्कॉटलंड यांच्यात तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली गेली. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा दौरा केला होता. तीन सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर स्कॉटलंडचा 3-0 असा क्लीन स्वीप केला होता. मालिकेतील शानदार विजयानंतर ऑस्ट्रेलियाला मिळालेली ट्रॉफी चर्चेचा विषय बनली आहे. वास्तविक, तुम्ही त्या ट्रॉफीला किंवा कपला सोप्या शब्दात वाटी (बाउल) म्हणू शकता.
अनेकदा देश अशी ट्रॉफी किंवा चषक बनवतात जे विजेत्या संघासाठी एक चांगली आठवण बनू शकतात. परंतु स्कॉटलंडने बनवलेला चषक केवळ हास्याचा विषय बनला आहे. विजयानंतर मार्शला कोटोरीसारखी ट्रॉफी देण्यात आली तेव्हापासून चाहते स्कॉटलंड क्रिकेटला सतत ट्रोल करताना दिसत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या विजयानंतर कर्णधार मिचेल मार्शला चषक देण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ट्रॉफी स्वीकारताना खुद्द मिचेल मार्शही चकित झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यानंतर मार्शने बाकीच्या संघाला चषक दाखवला तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटले. चषक पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू हसायला लागले.
Hamare local tournament mai bhi jab intezamia entrees kha jati thi tw end pai aisi trophy deti thi…. pic.twitter.com/JFVnyZ9X9T
— Usama Zafar (@Usama7) September 10, 2024
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजयानंतर ऑस्ट्रेलियाला देण्यात आलेली बाऊलसारखी ट्रॉफी सामान्य बाउल नसून त्याला स्कॉटिश स्मृतीचिका म्हणतात. हे व्हिस्की साठवण्यासाठी वापरले जाते आणि व्हिस्की हे स्कॉटलंडचे राष्ट्रीय पेय आहे.
ऑस्ट्रेलियाने मालिकेतील तीनही सामने शानदारपणे जिंकले होते. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडचा 7 गडी राखून पराभव केला होता. यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने स्कॉटलंडवर 70 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाने 6 विकेटने जिंकला.
हेही वाचा-
‘हिटमॅनचा मुंबई इंडियन्ससोबतचा प्रवास संपणार’, माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
कांगारुंचा वरचढ! यजमान इंग्लंडचा घरच्या मैदानावर दारुण पराभव
AFG vs NZ; कसोटीच्या चौथ्या दिवशीही पावसाची सावली, टॉसशिवाय सामना रद्द होणार?