ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिस याने पॅट कमिन्ससारखा कर्णधार मिळाल्याने स्वत:ला भाग्यवान समजले पाहिजे, असे मत ने व्यक्त केले. स्टॉइनिस म्हणतो की, पॅट कमिन्सने कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले त्याबद्दल त्याला खूप आदर मिळाला आहे.
एका मुलाखतीत मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) याने पॅट कमिन्स (Pat Cummins) च्या कर्णधारपदावर आपले विचार मांडले आहे. तो म्हणाला की, “जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तुम्हाला समजेल की, कमिन्सने फक्त दिड वर्षापासून कर्णधारपद किती चांगल्या प्रकारे सांभाळले आहे. तो संघासाठी गोलंदाज होता आणि त्याच्यासाठी कर्णधार पद हे नवीन होते. तो गोलंदाज आणि संघाचा कर्णधार असल्याने त्याला स्वत:ला तंदुरूस्त ठेवावे लागते. जेव्हा तो कर्णधार झाला तेव्हा ऑस्ट्रेलियन संघाने नविन प्रशिक्षक देखिल नेमले होते. त्याला नवीन प्रशिक्षकासोबत काम करावे लागले, आणि हे कठीण काम आहे”
पुढे स्टॉइनिस म्हणाला की, “तो एक शांत अणि चांगला खेळाडू आहे. तो संघाला नेहमीच उत्साहीत करत असतो. तुम्ही त्याचा सन्मान करायला हवा. “ऑस्ट्रेलियन क्रिकेट हे खूप भाग्यवान आहे की त्याच्यासारखा कर्णधार संघाला मिळाला. एक क्रीडा गट म्हणून आम्हाला त्याचा नक्कीच अभिमान आहे, आणि त्याच्या हाताखाली खेळण्याचा आम्हाला अभिमान आहे. गेल्या काही वर्षांत त्याने खूप आदर मिळवला आहे”.
पॅट कमिन्सने त्याच्या कसोटी कर्णधारपदाच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनदा ऍशेस मालिकेचे नेतृत्व केले आहे. 2021-22 च्या ऍशेसमध्ये ऑस्ट्रेलियाने कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऍशेस 4-0 ने जिंकली, तर ऍशेस 2023 2-2 बरोबरीत संपली. त्यामुळे कमिन्सच्या संघाने पुन्हा एकदा ऍशेस ट्रॉफी राखली आहे.
याशिवाय कमिन्सच्या ऑस्ट्रेलियन संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021-23 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकले. आता कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया प्रथमच एकदिवसीय स्वरूपातील सर्वात मोठ्या स्पर्धेत भाग घेणार आहे. आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये ऑस्ट्रेलिया सहभागी होणार आहे आणि या विश्वचषकासाठी कांगारू संघाला विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. (australian cricketer marcus stoinis on pat cummins say’s australian cricket team is lucky to hav him captain)
महत्वाच्या बातम्या-
मयंक अग्रवाल पुन्हा चर्चेत, केवळ 57 चेंडूत ठोकले शतक
बीसीसीआयचा खिसा भरणार गच्च! टीम इंडियाला मिळाला नवीन टायटल स्पॉन्सर, 3 वर्षांमध्ये छापणार ‘एवढा’ पैसा