ऑस्ट्रेलियन ओपन २०२१ च्या ग्रँडस्लॅम स्पर्धेत महिमा एकेरीचे विजेतेपद जपानच्या नाओमी ओसाकाने मिळवले आहे. तिने अंतिम सामन्यात अमेरिकेच्या जेनिफर ब्रेडीचा पराभव करत दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद आपल्या नावावर केले. ओसाकाने ब्रेडीला अंतिम सामन्यात ६-४, ६-३ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत करत हे विजेतेपद मिळवले.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ओसाकाचे कारकिर्दीतील हे एकूण चौथे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तिने याआधी २०१८ आणि २०२० साली अमेरिकन ओपनचे विजेतेपद मिळवले होते. तर २०१९ साली तिने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद मिळवले होते.
ओसाकाने उपांत्य फेरीच दिग्गज सेरेना विलियम्सला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर २२ व्या मानांकित ब्रेडी हिने कॅरोलिना मुचोवाला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली होती. ब्रेडीचा हा पहिलाच ग्रँडस्लॅम स्पर्धेचा अंतिम सामना होता.
𝒯𝒽𝒶𝓉 𝓂𝑜𝓂𝑒𝓃𝓉.
When @naomiosaka became our 2021 Women's Singles champion 🏆#AO2021 | #AusOpen pic.twitter.com/Id3ZZhaJHh
— #AusOpen (@AustralianOpen) February 20, 2021
ओसाकाचे अंतिम सामन्यात वर्चस्व
एक तास सतरा मिनिट चाललेल्या अंतिम सामन्यात पहिल्या सेटमध्ये ब्रेडीने ओसाकाच्या तोडीचा खेळ करत ४-४ अशी बरोबरी साधली होती. मात्र त्यानंतरचे दोन्ही गेम ओसाकाने जिंकत पहिला सेट आपल्या नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र ओसाकाने ब्रेडीला कोणतीही संधी न देता वर्चस्व राखले. तिने पहिले चारही गेम जिंकत ४-० अशी आघाडी घेतली. पण यानंतर ब्रेडीने पुनरागमन करत पुढचे २ गेम जिंकले. पण ओसाकाने तिचे वर्चस्व कायम राखत ५-२ अशी आघाडी वाढवली. ब्रेडीनेही नंतर एक गेम जिंकला. पण अखेर ओसाकाने आपल्या सर्विसवर पुढचा गेम जिंकला आणि सेट ६-३ असा जिंकत विजेतेपदाला गवसणी घातली. विशेष म्हणजे ओसाकाचा हा सलग २१ वा विजय होता.
महत्त्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियन ओपनचे कोर्ट्स जोकोविचला जिंकण्यासाठी मदत करतायत? घ्या जाणून कसं ते
ऑस्ट्रेलियन ओपन : दुसऱ्या मानांकित राफेल नदालला पराभवाचा धक्का; त्सित्सिपास सेमीफायनलमध्ये दाखल
ऑस्ट्रेलियन ओपन : वयाशी तिशी पार केलेल्या जोकोविचची कमाल, ‘हा’ विक्रम करणारा ठरला पहिलाच