---Advertisement---

ऑस्ट्रेलियन संघ मैदानात उतरणार अनवाणी पायांनी; कारण आहे खूपच कौतुकास्पद

On: सोमवार, नोव्हेंबर 16, 2020 11:21 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या बहुचर्चित क्रिकेट मालिकांना २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. दौऱ्याची सुरुवात वनडे मालिकेने होणार आहे. त्यानंतर तीन सामन्यांची टी२० मालिका होईल. दौऱ्याच्या अखेरीस, चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. या संपूर्ण दौर्‍यातील सर्व मालिकांच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियन संघ अनवाणी पायाने मैदानात उतरणार आहे. वर्णद्वेषाला विरोध आणि ऑस्ट्रेलियाच्या मूळ संस्कृतीला समर्थन म्हणून ऑस्ट्रेलियन संघ हे कौतुकास्पद कृत्य करणार आहे.

पॅट कमिन्सने केला खुलासा
ईसपीएन क्रिकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार पॅट कमिन्स याने सांगितले, “वर्णद्वेषाविरोधात आणि ऑस्ट्रेलियाच्या मूळ संस्कृतीला समर्थन म्हणून, आम्ही प्रत्येक मालिकेच्या पहिल्या सामन्यावेळी मैदानावर अनवाणी गोलाकार उभे राहू. वर्णद्वेषाविरोधात हे एक छोटे पाऊल आहे. मात्र, आम्ही नवी सुरुवात करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे.”

मायकेल होल्डिंग यांनी केली होती ऑस्ट्रेलियन संघावर टीका
अमेरिकेत सुरू झालेल्या ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी अनेक क्रिकेट मालिकांमध्ये संघ, गुडघ्यावर बसून वर्णद्वेषाचा विरोध करतात. सप्टेंबर महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील मर्यादित षटकांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ गुडघ्यावर बसला नव्हता. त्यावेळी वेस्ट इंडिजचे माजी दिग्गज गोलंदाज मायकेल होल्डिंग यांनी ऑस्ट्रेलियन संघावर टीका केली होती.

त्याविषयी विचारले असता कमिन्स म्हणाला, “काही लोक वर्णद्वेषाला विरोध म्हणून गुडघ्यावर बसतात. मात्र, आम्ही दुसऱ्या पद्धतीने याला विरोध करू. आता आम्ही एक संघ म्हणून एकत्र आलो आहोत. आम्ही निवडलेला मार्ग आम्हाला सर्वोत्तम वाटला. वर्णद्वेषाला विरोधासह ऑस्ट्रेलियाच्या मूळ संस्कृतीचे जतन करण्याच्या उद्देशाने आम्ही ही मोहीम आता सुरू केली आहे.”

अमेरिकेत झालेल्या कृष्णवर्णीयांवरील हल्ल्याला विरोध म्हणून ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ ही जागतिक मोहीम चालवली जात आहे. इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज या मालिकेत या मोहिमेला जोरदार पाठिंबा दिला गेला होता. आयपीएलमध्ये देखील भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने अर्धशतकानंतर गुडघ्यावर बसून या मोहिमेला आपले समर्थन दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

वनडे मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; ‘या’ प्रमुख खेळाडूचे खेळणे अनिश्चित

‘असे’ ठरणार कसोटी चॅम्पियनशीपमधील अव्वल दोन संघ; भारतासाठी वाट कठीण

“विराट जागतिक क्रिकेटमधील सामर्थ्यवान खेळाडू”, ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाचे वक्तव्य

ट्रेंडिंग लेख-

‘डेमियन फ्लेमिंग’… पहाट स्वप्न सत्यात उतरलेले पाहिलेला ऑसींचा एकमेव गोलंदाज

‘जिनीयस’ हेमांग बदानीची पुण्यातील ‘ती’ अद्वितीय खेळी

सचिनची ‘ती’ खेळी कधीच विसरली जाणार नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---