आयपीएलचा आतापर्यंतचा इतिहास पाहता, ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी या लीगमध्ये आपली प्रतिभा दाखवली आहे. लीगच्या पहिल्या दोन मोसमात ऑरेंज कॅप ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्श आणि मॅथ्यू हेडनने जिंकली होती. याशिवाय या लीगमध्ये डेव्हिड वॉर्नरचा दर्जा एक वेगळ्याच पातळीवर आहे. या खेळाडूने आपल्या फलंदाजीच्या जोरावर स्वतःला आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी परदेशी फलंदाज म्हणून स्थापित केले आहे.
खेळाडूंना प्रत्येक हंगामात चांगली कामगिरी करणे शक्य नसते आणि या हंगामातही असेच काही घडले. काही ऑस्ट्रेलियन खेळाडू चांगली कामगिरी करू शकले नाहीत. हे लक्षात घेऊन आपण जाणून घेणार आहोत त्या ३ खेळाडूंबद्दल जे १४ व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात अयशस्वी ठरले.
डॅनियल ख्रिश्चयन
आयपीएलच्या १४ व्या मोसमात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू डॅनियल ख्रिश्चयनला पुन्हा एकदा त्याचा आधीचा संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून खेळण्याची संधी मिळाली. बर्याच काळानंतर, ख्रिश्चयन आयपीएलमध्ये खेळणार होता. त्याने बिग बॅशमध्ये जसे प्रदर्शन केले त्याच कामगिरीची पुनरावृत्ती आयपीएलमध्ये होईल अशी प्रत्येकाची अपेक्षा होती. पण, पहिल्या तीन सामन्यांमध्ये, तो प्रभाव पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरला.
ख्रिश्चयनने एकही विकेट घेतली नाही आणि फलंदाजीतही फक्त ३ धावा केल्या. त्याची कामगिरी आरसीबीच्या अपेक्षांनुसार झाली नाही. अशा परिस्थितीत, ख्रिश्चयन निश्चितपणे दुसऱ्या टप्प्यात चांगली कामगिरी करून संघासाठी योगदान देण्यास प्रयत्नशील राहील.
झाय रिचर्डसन
बिग बॅश हंगामात शानदार कामगिरी केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनसाठी आयपीएल लिलावात बरीच स्पर्धा झाली आणि अखेरीस पंजाब किंग्सने त्याला १४ कोटींमध्ये खरेदी केले. एवढी मोठी रक्कम आणि रिचर्डसनची अलीकडची कामगिरी पाहता प्रत्येकाला त्याच्याकडून मोठ्या आशा होत्या, पण तोही आपली छाप पाडण्यास अयशस्वी राहिला.
या हंगामाच्या पहिल्या टप्यात खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांमध्ये त्याने १०.६३ च्या खराब इकॉनॉमी रेटने फक्त ३ विकेट्स घेतल्या. रिचर्डसन या मोसमाच्या दुसऱ्या टप्प्यात खेळताना दिसणार नाही, कारण पंजाब किंग्सने त्याच्या जागी इंग्लंडच्या आदिल रशीदची निवड केली आहे.
मार्कस स्टॉयनिस
आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसने आयपीएल २०२० मध्ये शानदार खेळ दाखवला होता आणि दिल्लीला अंतिम फेरीत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. पण या आयपीएलच्या १४ व्या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात स्टॉयनिस ना फलंदाजीत लयीमध्ये दिसला आणि ना गोलंदाजीत चांगली कामगिरी दाखवू शकला. स्टॉयनिसने ८ सामन्यात फक्त ७१ धावा केल्या आणि गोलंदाजीत त्याला फक्त २ विकेट घेता आल्या. दिल्लीला आशा आहे की त्यांचा हा खेळाडू दुसऱ्या टप्प्यात आपला स्फोटक खेळ नक्कीच दाखवेल.
महत्त्वाच्या बातम्या –
तुफानी फटकेबाजी! टी२० विश्वचषकात सर्वात वेगवान अर्धशतक करणारे ५ फलंदाज
समालोचनावेळी कैफ असं काही बोलला, ज्यामुळे सेहवाग म्हणाला, “आता तुझ्यामुळे मार खायची वेळ येऊ शकते”
“देवासाठी तरी त्याला सोडा आणि पुढे चला”, रहाणे शुन्यावर बाद झाल्यानंतर पडतोय मीम्सचा पाऊस