ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाच्या मुख्य फेरीला 22 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. मात्र, त्या आधीच खेळाडू सातत्याने दुखापतग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. विश्वचषकाआधी काही प्रमुख खेळाडू दुखापतीने स्पर्धेबाहेर गेल्यानंतर विश्वचषकाच्या पहिल्या फेरी दरम्यानच अनेक खेळाडू दुखाग्रस्त होण्याच्या बातम्या येत आहेत. यामध्ये नवे नाव ऑस्ट्रेलियाचा युवा यष्टीरक्षक जोश इंग्लिस याचे आहे.
माध्यमातील वृत्तानुसार, भारताविरुद्धच्या सराव सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन संघ विश्रांती दरम्यान न्यू साउथ वेल्स येथे गोल्फ खेळण्याचा आनंद घेत होता. यादरम्यान त्याच्या हाताला दुखापत झाली. त्यावेळी त्याच्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यामुळे त्याला तातडीने दवाखान्यात दाखल केले गेले. त्याची दुखापत कितपत गंभीर आहे याबाबत माहिती मिळाली नाही.
ऑस्ट्रेलियन संघात प्रमुख यष्टिरक्षक म्हणून मॅथ्यू वेड याची जागा पक्की आहे. इंग्लिस याला सुरुवातीच्या सामन्यासाठी संघात जागा मिळणे अवघड दिसते. मात्र, वेडलाही अचानक दुखापत झाल्यास ऑस्ट्रेलियन संघ अडचणीत येऊ शकतो.
अगदी अशाच प्रकारचे प्रकरण इंग्लंडचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टो याच्यासोबत घडले होते. विश्वचषकासाठी इंग्लंड संघाची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासात बेअरस्टो गोल्फ खेळताना पडल्याने दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याला विश्वचषकातून बाहेर व्हावे लागले होते.
विश्वचषक सुरू होण्याआधी बेअरस्टोप्रमाणेच भारताचा रवींद्र जडेजा व जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडले होते. विश्वचषकाची पहिली फेरी खेळत असलेल्या श्रीलंका संघातील दुष्मंता चमिरा व प्रमोद मधुशान हे दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर झाले आहे. तसेच, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज रिसे टोप्ली हा देखील सराव सामने दरम्यान दुखापतग्रस्त होऊन विश्वचषकाला मुकणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जमलंय बघा! विराट कोहलीने केली ‘पुष्पा’मधील सुपरहिट ऍक्शन, व्हिडिओ जोरदार व्हायरल
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर