ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचा कोविड-१९ चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर तो आता सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. वॉर्न ‘द हंड्रेड’ टीम लंडन स्पिरिटचा मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार सांभाळत आहे. त्याच्या व्यातिरिक्त संघ व्यवस्थापनाच्या आणखी एका सदस्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
वॉर्नची प्रकृती रविवारी (१ ऑगस्ट) सकाळी लॉर्ड्सवर स्पिरिट टीमच्या साउदर्न ब्रेव्हविरुद्धच्या सामन्यापूर्वी बिघडली होती. क्रिकइन्फोमधील अहवालानुसार, वॉर्नची नंतर कोरोनाची चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय, आरटी-पीसीआर चाचणीच्या अहवालाची देखील प्रतीक्षा आहे. दरम्यान, आत्तापर्यंत स्पिरिट संघातील कोणत्याही खेळाडूवर याचा परिणाम झाल्याची माहिती नाही.
‘द हंड्रेड’ लीग सुरू झाल्यानंतर वॉर्न हा कोविड-१९ ची लागण झालेला दुसरा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याच्यापुर्वी ट्रेंट रॉकेट्सचे मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर देखील गेल्या आठवड्याच्या अखेरीस या जागतिक महामाहीने संक्रमित झाले होते. वॉर्नच्या स्पिरिट संघाने साखळी फेरीतील त्यांच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन गमावले आहेत. तर, एका सामन्याचा निकाल लागला नाही. डेव्हिड रिपले, नॉर्थम्पटनशायर संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि स्पिरिट संघाचे सहाय्यक, वॉर्नच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारतील.
शेन वॉर्नची कारकीर्द
शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी जवळपास १५ वर्षे क्रिकेट खेळला. त्याने १४५ कसोटी सामने आणि १९४ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या कसोटी क्रिकेटमध्ये ७०८ आणि वनडे क्रिकेटमध्ये २९३ विकेट्स आहेत. शेन वॉर्नने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १० वेळा एकाच कसोटी सामन्यात १० व त्यापेक्षा जास्त विकेट्स मिळवल्या आहेत.
शेन वॉर्न हा ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू असून तो खेळाच्या इतिहासातील एक महान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. वॉर्नने १९९२ मध्ये पहिला कसोटी सामना खेळला आणि १००० आंतरराष्ट्रीय विकेट्स (कसोटी आणि एकदिवसीय) घेणारा श्रीलंकेचा मुथैया मुरलीधरननंतर तो दुसरा गोलंदाज बनला.
महत्त्वाच्या बातम्या-
युएई नव्हे तर ‘या’ देशात होणार टी२० विश्वचषकातील सुरुवातीचे ६ सामने, जाणून घ्या यामागचे कारण
प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीने धोनीसोबत जोडले नाते; फोटो शेअर करत म्हणाली, ‘होय, मी माहीची बहीण आहे’
‘ये चाँद सा रोशन चेहरा’ गाण्यावर विराटचा अनुष्कासंगे रोमँटिक डान्स; पाहून तुम्हीही म्हणाल, ‘वाह!’