---Advertisement---

टी२० विश्वचषकात खेळताना दिसणार का फिंच आणि स्मिथ? ऑसी कर्णधाराने दिले दुखापतीबद्दल अपडेट

On: बुधवार, ऑगस्ट 18, 2021 11:43 PM
---Advertisement---

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान टी२० विश्वचषकाचे आयोजन संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे होणार आहे. या विश्वचषकासाठी सर्वच संघ तयारीला लागेल आहे. नुकतेच ऑस्ट्रेलियासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचे स्टार फलंदाज ऍरॉन फिंच आणि स्टिव्ह स्मिथ गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीमुळे मैदानापासून दूर आहेत. त्यामुळे टी२० विश्वचषकातील त्यांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह होते, आता याबाबदत ताजे अपडेट आले आहे.

ऑस्ट्रेलियाचा मर्यादीत षटकांच्या संघाचा कर्णधार फिंचने स्वत: त्यांच्या तंदुरुस्तीबाबत माहिती दिली आहे. त्याने सांगितले आहे की तो आणि स्मिथ दोघेही टी२० विश्वचषकात खेळू शकतात. या आठवड्याच्या अखेरीस टी२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर केला जाऊ शकतो.

यावर्षी आयपीएल २०२१च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये स्मिथला कोपऱ्याला झालेल्या दुखापतीला सामोरं जावं लागलं होत. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर गेला होता. मात्र, आता त्याने न्यू साउथ वेल्समधील मैदानावर नेटमध्ये फलंदाजीचा सराव सुरू केला आहे. त्याचबरोबर, गुडघ्याच्या शस्त्रक्रियेनंतर सावरत असलेल्या फिंचनेही टी२० विश्वचषकापूर्वी पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची आशा व्यक्त केली आहे.

स्मिथची पुनरागमनाची प्रक्रिया चांगली सुरू आहे
फिंच म्हणाला, “स्टिव्ह स्मिथची तंदुरुस्ती पुनर्प्राप्ती प्रक्रिया खूप चांगली सुरू आहे. तो गेल्या दोन आठवड्यांपासून नेट्समध्ये त्याच्या फलंदाजीवर हळुहळू काम करत आहे. दुखापत लक्षात घेऊन त्याने नेट सरावाची वेळ मर्यादा ठेवली आहे. काळजी घेणे हे महत्वाचे आहे. तो खूप काळजीपूर्वक सराव करत आहे, जेणेकरून त्याच्या कोपऱ्याची दुखापत पुन्हा उद्भवू नये.”

तो असे देखील म्हणाला की, “गेल्या वेळी जेव्हा मी स्मिथशी बोललो, तेव्हा त्याने सांगितले की, फलंदाजी करताना त्याला कोणतीही वेदना जाणवली नाही. ही खूप सकारात्मक गोष्ट आहे. टी२० विश्वचषकात तो आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.”

फिंचने स्वतःच्या फिटनेसबद्दलही दिली माहिती
फिंचने टी२० विश्वचषकापूर्वी स्वत: पूर्णपणे फिट होईल अशी आशा व्यक्त केली. तो म्हणाला की, “मला प्रचंड विश्वास आहे की, मी टी२० विश्वचषकासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईन. मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा खूप अनुभव आहे. त्यामुळे मी पुन्हा चांगले क्रिकेट खेळू शकतो. सामन्याच्या कमी सरावामुळे मला कसलाच फरक पडणार नाही.”

तो असाही म्हणाले की, “माझ्या गुडघ्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. मी कोणत्याही वेदनेशिवाय चालण्यास सध्या सक्षम आहे, ही गोष्ट या टप्प्यावर सर्वात महत्त्वाची आहे.”

टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत २३ ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला सामना खेळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘मुळीच असं समजू नका की, खेळ इथेच संपला आहे’, माजी इंग्लिश कर्णधाराची भारतीय संघाला चेतावणी

तुमच्याही लक्षात आली नसेल ही बाब, लॉर्ड्स कसोटीतील रोहित शर्माचा ‘तो’ व्हिडिओ प्रचंड व्हायरल

राजस्थान रॉयल्सच्या अष्टपैलू खेळाडूची ‘द हंड्रेड’ स्पर्धेत तळपली बॅट; तब्बल १० षटकारांसह काढल्या ९२ धावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---