नुकतीच भारतीय संघाची वेस्ट इंडीजविरुद्ध (India vs West Indies) तीन सामन्यांची टी२० मालिका कोलकत्ता येथे पार पडली. या मालिकेत भारताने वेस्ट इंडीज संघाला क्लीन स्वीप देत मालिका ३-० ने जिंकली आहे. या मालिकेतील रविवारी (२० फेब्रुवारी) पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज आवेश खानने (Avesh Khan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
आवेश खानला पदार्पणाची कॅप वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने(Bhuvneshwar Kumar) घातली. यानंतर आवेश खान म्हणाला आहे की, रोहित शर्माने त्याला पाठिंबा दिला. तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला सामन्याचा आनंद लुटण्यास सांगितले होते.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर आकाऊंटवर सोमवारी (२१ फेब्रुवारी) एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये व्यंकटेश अय्यर आवेश खानची मुलाखत घेताना दिसत आहे. तेव्हा आवेश खान म्हणाला की, “सर्व खेळाडूंचे स्वप्न भारतीय संघासाठी खेळणे हे असते. आज माझे ते स्वप्न पुर्ण झाले आहे. रोहित भाईने मला चांगला पाठिंबा दिला. राहुल सर पण म्हणाले, पदार्पण करत आहेस, मजा कर. आजचा दिवास आनंदात साजरा कर आणि मी तेच केले.”
आवेश खानला आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पदार्पणाच्या सामन्यात एकही विकेट मिळाली नाही. त्याने त्याच्या ४ षटकांमध्ये ४२ धावा देत एकही विकेट घेतली नाही.
#TeamIndia debut ????
Message from Captain & Head Coach ????
Relishing the responsibility ????@venkateshiyer chats up with @Avesh_6 after India's T20I series sweep against West Indies in Kolkata. ???? ???? – By @MoulinparikhFull interview ???? ???? @Paytm #INDvWI https://t.co/MrvekFS7yc pic.twitter.com/r0PLXvkktP
— BCCI (@BCCI) February 21, 2022
तिसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ४ बदल केले होते. आवेश व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर आणि शार्दूल ठाकूरला संधी दिली होती. रिषभ पंत, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि माजी कर्णधार विराट कोहली हे या सामन्यात खेळले नाहीत. भारतीय संगाने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली आणि वेस्ट इंडीज संघासमोर १८४ धावांचे आव्हान ठेवले. सूर्यकुमार यादवने ३१ चेंडूत ६५ धावा केल्या. त्याला या सामन्यात सामानावीर म्हणून गौरवण्यात आले.
भारतीय संघ पुढच्या विश्वचषकाच्या दृष्टीने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सतत बदल करत आहे. कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, पुढील मालिकांमध्ये भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असेच बदल दिसू शकतात. आयसीसी टी२० विश्वचषकाचे नियोजन या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियामध्ये करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पूरनच्या फॉर्मने हैदराबादला चढले स्फुरण; भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतकांसह मोठे विक्रम नावावर
धवन स्टाइलमध्ये जल्लोष पाकिस्तानी खेळाडूला पडला महागात, दोन वेळा भरावा लागला दंड






