वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना किंग्स्टन येथे खेळला जात आहे. सामन्यात वेस्ट इंडिजच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानी संघ फलंदाजीसाठी उतरला. मात्र, त्यांनी आपले पहिले तीन गडी केवळ २ धावांमध्ये गमावले. केमार रोचने पाकिस्तान संघाला सलग दोन धक्के दिले. त्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने फवाद आलमसह संघाचा डाव सावरला. आपल्या अर्थशक्ती खेळीदरम्यान बाबर आझमने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
पाकिस्तानची निराशाजनक सुरुवात
पहिल्या रोमांचक कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर पाकिस्तानची दुसऱ्या कसोटीतही खराब सुरुवात झाली. केमार रोचच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पाकिस्तानचे ३ गडी दोन धावांवर माघारी परतले. आबिद अली व इम्रान बट प्रत्येकी एका तर, अझर अली खातेही न खोलता तंबूत परतला.
बाबर-फवादची निर्णायक भागीदारी
संघाला अडचणीतून बाहेर काढण्याचे काम चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कर्णधार बाबर आझम व अनुभवी फवाद आलम यांनी केले. दोघांनी संयमाने फलंदाजी करत वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा सामना केला. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. बाबर व फवाद यांच्यादरम्यान १५८ धावांची अभेद्य भागीदारी झाली. मात्र, वैयक्तिक ७६ धावांवर असताना दुखापतग्रस्त झाल्यामुळे फवादला मैदान सोडावे लागले. त्यानंतर बाबरही अधिक काळ टिकला नाही व जेसन होल्डरच्या चेंडूवर ७५ धावा काढून माघारी परतला.
बाबरच्या नावे नवे विक्रम
बाबर-फवाद यांनी आपल्या भागीदारी दरम्यान १० पेक्षा कमी धावांत ३ गडी बाद झाल्यानंतर सर्वाधिक धावांच्या दुसऱ्या सर्वोच्च भागीदारीचा विक्रम केला. अशा प्रकारच्या भागीदारीचा सर्वात मोठा विक्रम वेस्ट इंडीजच्या गोम्स व क्लाईव्ह लॉईड यांच्या नावे असून त्यांनी १९८३ मध्ये भारताविरुद्ध २३७ धावांची भागीदारी केलेली.
यासोबतच बाबर पाकिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तेराव्या क्रमांकावर झेप घेतली. त्याने पाकिस्तानसाठी आत्तापर्यंत ३५ कसोटी, ८३ वनडे व ६१ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५१८ धावा केल्या आहेत. या खेळीदरम्यान त्याने अझर अलीला मागे सोडले.
महत्त्वाच्या बातम्या–
बिग ब्रेकिंग! उर्वरित आयपीएलसाठी आरसीबीच्या ताफ्यात तीन नवे शिलेदार
भारताच्या सर्वात यशस्वी ५ गोलंदांजामध्ये इशांतचा होऊ शकतो समावेश; फक्त ‘ही’ कामगिरी करण्याची गरज
लॉर्ड्स कसोटीतील बहुमुल्य योगदानानंतर रहाणेची कुटुंबासोबत मजा-मस्ती, तुम्हीही पाहा