कराची किंग्सने मंगळवारी(17 नोव्हेंबर) पाकिस्तान सुपर लीगचे पहिले विजेतेपद जिंकले. त्यांनी लाहोर कलंदर्सचा 5 गडी राखून पराभव केला. नाबाद 63 धावा करणारा स्टार फलंदाज बाबर आजम या विजयाचा नायक होता.
या सामन्यात प्रमथ फलंदाजी करताना लाहोर कलंदर्सने 7 गडी गमावत 134 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल बाबरच्या अर्धशतकी खेळीने कराची किंग्सने 19 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर सामना जिंकला. बाबरने या सामन्यात 49 चेंडूत 63 धावा केल्या. या खेळीत त्याने 7 चौकार मारले. या शानदार खेळीनंतर ट्विटरवर बाबर आझम ट्रेंड करत आहे, लोक त्याची तुलना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशी करत आहेत.
बाबरच्या काही चाहत्यांनी विराट कोहलीच्या तुलनेत त्यालाच सर्वश्रेष्ठ मानले आहे. यातील एका चाहत्याने ‘तू दुसरा विराट कोहली नसून तू पहिला बाबर आहेस’ असे म्हटले आहे. बाबर आझमने पीएसएल किताब जिंकलाय तर कोहलीला अजूनही आयपीएल विजेतेपद जिंकता येत नाहीये, असेही म्हणत त्याचे चाहते त्याला श्रेष्ठ ठरवू पाहत आहेत. यामुळे तो ट्विटरवर ट्रेंड करीत आहे.
https://twitter.com/mycricketcorner/status/1328888700852465664
@SafiKhanMagical evening. What's your View about the present comparision of Virat kohli and Babar azam.? Although many people said that babar azam as equal with kohli. But I feel Virat is still much more better than babar
— Dr.chinmoy deka MA, MPhil, PhD, SLET. (@cdeka678) November 18, 2020
https://twitter.com/MalikBasitAmin1/status/1329029632700547073
https://twitter.com/MalikBasitAmin1/status/1329016230670286853
Absolutely spot on! He is the first Babar Azam not the second Virat Kohli. https://t.co/Jt36Ok5HQf
— Dr. LittMann 🇿🇦 (@Lumber_one_Dr) November 18, 2020
https://twitter.com/iJohnAlbert/status/1328777193506344962
So next time when you compare Babar Azam with Virat Kohli, remember that Babar Azam has won a PSL trophy whereas Virat Kohli is yet to win an IPL! 😂💙#YehHaiKarachi #HBLPSLV
— Musaf Hanif (@the_terrific_m) November 17, 2020
पाकिस्तान सुपर लीगमध्ये मोठे विक्रम बाबरच्या नावावर –
लाहोरमध्येच राहणाऱ्या बाबर आझमने अंतिम सामन्यात लाहोरचाच पराभव केला होता. बाबर आझमने 2020 च्या पीएसएल हंगामात 473 धावा केल्या. आतापर्यंत पीएसएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा तो फलंदाज बनला आहे. याअगोदर ल्युक रोंचीने 2018 च्या हंगामात 435 धावा केल्या होत्या. शिवाय बाबर 163 चौकार ठोकून पीएसएलमध्ये सर्वाधिक चौकार ठोकणारा फलंदाज तो बनला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीच्या नेतृत्वाखाली अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या खेळाडूने घेतली निवृत्ती
अरेरे..! कमीतकमी स्वतःच नाव तरी बदल; पाहा का झाला शोएब मलिक सोशल मीडियावर ट्रोल
विराट एकटाच दोन खेळाडूंच्या बरोबरीचा! ऑस्ट्रेलियन दिग्गजाची विराटवर स्तुतीसुमने
ट्रेंडिंग लेख –
पॉटींगच्या गोलंदाजी विभागाचा ‘सरसेनापती’ राहिलेल्या ब्रेट लीची अनोखी कहानी
ही ‘त्रिमूर्ती’ गाजवणार आयपीएल २०२१चा मेगा लिलाव; निवृत्त झालेला खेळाडू होणार मालामाल?
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा केला होता प्लॅन