---Advertisement---

बाबर आझम पुन्हा अडकला वादाच्या भोवऱ्यात, दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी पाकिस्तान संघाला धक्का

On: गुरूवार, मार्च 18, 2021 6:46 PM
babar azam
---Advertisement---

सध्या पाकिस्तान क्रिकेटचे अत्यंत वाईट दिवस सुरू आहेत. पीएसएल स्थगित झाल्यानंतर, संघ निवडीवरून वाद निर्माण झाला आहे. आता, या मालिकेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम हा देखील सामील झाला असून, त्याने कोविड-१९ नियमावलीचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले. आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या दृष्टीनेही पाकिस्तानसाठी दुःखद बातमी आहे.

बाबरने मोडला नियम
सध्या जगभरात कोविड-१९ या साथीच्या आजारांचा प्रसार वेगाने होतोय. त्यामुळे, आयसीसीने क्रिकेटपटूंसाठी वेगळी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार, सर्व खेळाडूंना बायोबबलमध्ये राहावे लागते. मात्र, पाकिस्तानी कर्णधार बाबर आझमने हा नियम मोडला.
आपल्या स्थानिक क्लबच्या काही प्रश्नांसंबंधी बाबर पंजाब स्पोर्ट्स बोर्डचे संचालक अदनान अर्शद यांना भेटला. ही भेट अर्शद यांच्या कारमध्ये झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.

बाबरची झाली होती कोविड चाचणी
सध्या पाकिस्तानी संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तयारीला लागला आहे. मंगळवारी सर्व संघाची नॅशनल हाय परफॉर्मन्स सेंटर येथे कोविड चाचणी घेण्यात आली होती. आझमला या चाचणीनंतर घरी राहण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी हा मुलभूत नियम तोडत अर्शद यांची भेट घेतली. सध्या पीसीबीने त्याला घरी राहण्यास सांगितले असून, नंतर याविषयी चर्चा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

चर्चेत आहे बाबर
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणाऱ्या संघाच्या संघनिवडीत आपले मत विचारात घेतली नसल्याचे, बाबरने म्हटले होते. त्यानंतर, पाकिस्तानचे माजी कर्णधार इंजमाम उल हक व शाहिद आफ्रिदी यांनी त्याचे समर्थन करत, कर्णधाराच्या पसंतीचे खेळाडू संघात असायला हवेत असे म्हटले. पाकिस्तान निवड समितीने ११२ किलो वजन असलेल्या शारजील खान याचा संघात समावेश केला आहे. ज्याचा कर्णधार बाबर व प्रशिक्षक मिसबाह उल-हक विरोध करत आहेत. पाकिस्तान संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ वनडे व ३ टी२० सामने खेळेल.

महत्वाच्या बातम्या:

INDvsENG 4th T20 Live: इंग्लंडचा टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय, भारतीय संघात सूर्यकुमारला पुन्हा संधी

इंग्लिश गोलंदाजांनी ओळखली आहे हार्दिकची ही उणीव, माजी दिग्गजाची टिप्पणी

टीम इंडियाचं वेळापत्रक गजबजलं! ऑक्टोबर महिन्यात मायदेशात होणार दोन टी२० मालिका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---