ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान (AUS vs PAK) यांच्यामध्ये रावळपिंडी येथे सध्या कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेच्या पहिल्या कसोटीदरम्यान पाकिस्तानचा फलंदाज आणि कर्णधार बाबर आझम (Babar azam) त्याच्या गोलंदाजीमुळे चर्चेत आहे. तो या कसोटीदरम्यान भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याची (Virat kohli) काॅपी करताना दिसला आहे.
बाबर आझमची नेहमीच फलंदाजीबाबत विराटशी तुलना होत असतो. पण आता गोलंदाजीत देखील तो विराटची काॅपी करताना दिसला आहे. त्याने कोहलीसारखा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचा गोलंदाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. चाहते त्या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.
बाबर आझमने एकाच षटकात गोलंदाजी केली, ज्यामध्ये त्याने ५ धावा देत एकही विकेट घेतली नाही. त्यामध्ये तो विराट कोहलीसारखी गोलंदाजीत नक्कल करण्याचा प्रयत्न करत होता. बाबरने त्याच्या कसोटी कारकिर्दीमध्ये गोलंदाजी करताना १ विकेट घेतली आहे. ही विकेट त्याने बांग्लादेशचा फलंदाजी मेहदी हसन याची घेतली होती. तसेच भारतीय फलंदाज विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकिर्दीत १७५ चेंडू टाकले आहेत, परंतु त्याने आत्तापर्यंत एकही विकेट घेतलेली नाही.
Babar bowling!
You saw it here first 👌🏼 #BoysReadyHain l #PAKvAUS pic.twitter.com/e4bQVzmp9Q— Pakistan Cricket (@TheRealPCB) March 7, 2022
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील शेवटची गोलंदाजी ख्राइस्टचर्चच्या मैदानात केली होती. २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळलेल्या सामन्यात विराट कोहलीने गोलंदाजी केली, तेव्हा त्याला विकेट मिळाली नाही. परंतु तो गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. तो मागील वर्षी टी२० विश्वचषकावेळी वाॅर्म अपच्या सामन्यांमध्ये देखील गोलंदाजी करताना दिसला होता.
पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये ४ मार्चपासून कसोटी मालिका सुरू झाली आहे. या मालिकेचा पहिला सामना सध्या सुरु आहे. दुसरा कसोटी सामना १२ ते १६ मार्च दरम्यान कराची, तर तिसरा कसोटी सामना २१ ते २५ मार्चदरम्यान लाहोर येथे खेळवला जाणार आहे. या दोन संघामध्ये खेळवल्या जाणाऱ्या ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा पहिला सामना २९ मार्च, दुसरा ३१ मार्च, तर तिसरा सामना २ एप्रिलला खेळला जाणार आहे. हे तिन्ही सामने रावळपिंडी येथे खेळले जाणार आहेत. यानंतर ५ एप्रिलला रावळपिंडी येथे टी२० मालिकेचा एकमेव सामना खेळवला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धोनीचा नवा लूक पाहिलात का? आयपीएल २०२२ मध्ये दिसणार नव्या हेअरस्टाईलसह, व्हिडिओ व्हायरल
आवडत्या मैदानात दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नवर होणार अंतिम संस्कार! १ लाख लोक लावतील उपस्थिती
अरर! लाईव्ह सामन्यात पाकिस्तानी खेळाडूची पँट फाटल्याने झाली फजिती, नेटकरी घेतायेत मजा