---Advertisement---

बाबर आझम वर विराटला ठरला भारी! ‘या’बाबतीत कोहलीला मागे टाकत हिटमॅनची केली बरोबरी

On: शुक्रवार, ऑक्टोबर 1, 2021 1:06 PM
---Advertisement---

भारतीय  संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आजम हे दोघेही सध्याच्या काळातील दिग्गज खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक मोठ-मोठे विक्रम आहेत. त्यामुळे दोघांमध्ये एकमेकांना मागे टाकण्याची स्पर्धा सुरूच असते. दरम्यान, बाबर आजमने आणखी एक मोठा कारनामा करत विराट कोहलीला मागे टाकले आहे.

बाबर आजम हा सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. त्याच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये ६ शतकांची नोंद झाली आहे. असा कारनामा करत त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे. विराट कोहलीच्या नावे टी -२० क्रिकेटमध्ये ५ शतकांची नोंद आहे. तर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माच्या नावे ६ शतकांची नोंद आहे. या यादीत बाबर आजमने रोहित शर्माची बरोबरी केली आहे.

बाबर आजमने हा कारनामा १९५ व्या टी -२० सामन्यात केला आहे. तर कर्णधार विराट कोहलीने हा कारनामा ३५३ सामन्यांमध्ये केला आहे. रोहित शर्मा आणि बाबर आजमसह शेन वॉटसनच्या नावे देखील टी -२० क्रिकेटमध्ये ६ शतक झळकावण्याचा पराक्रम आहे. त्यामुळे बाबर आजमने या बाबतीत शेन वॉटसनची देखील बरोबरी केली आहे.

बाबर आजमने हा कारनामा पाकिस्तानमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय टी-२० चषक स्पर्धेत सेंट्रल पंजाब संघासाठी खेळताना नॉर्दर्न संघाविरुद्ध केला. त्याने ६३ चेंडूंमध्ये १०५ धावांची तुफानी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ३ षटकार मारले होते. या खेळीच्या जोरावर सेंट्रल पंजाब संघाला २०० धावा करण्यात यश आले होते. परंतु, नॉर्दर्न संघाकडून हैदर अलीने ९३ धावांची खेळी करत सेंट्रल पंजाब संघाला पराभूत केले.

टी -२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज जर कोण असेल तर तो ख्रिस गेल आहे. ख्रिस गेलच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. तसेच टी -२० मध्ये त्याच्या नावे २२ शतकांची नोंद आहे. त्यानंतर मायकल क्लिंजरने ८ शतक झळकावले आहेत. तर डेव्हिड वॉर्नरने देखील ८ शतक झळकावले आहेत. तसेच ऍरॉन फिंचच्या नावे देखील ८ शतकांची नोंद आहे. तसेच ल्यूक राईट आणि ब्रेंडन मॅक्क्यूलमच्या नावे यांच्या नावे प्रत्येकी ७ शतकांची नोंद आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

मांजरेकरांनी जडेजावर पुन्हा साधला निशाणा; म्हणाले, ‘मी अजूनही त्याच्या फलंदाजीबाबत आश्वस्त नाही’

मंधनाचा ऑस्ट्रेलियाला शतकी तडाखा! ‘हा’ कारनामा करणारी बनली पहिलीच भारतीय महिला क्रिकेटर

नाम बडे और दर्शन छोटे! आयपीएल २०२१ स्पर्धेतील या ‘३’ खेळाडूंची कामगिरी पाहून तुम्ही ही असच म्हणाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---