पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम सद्या टी-20 विश्वचषक 2022 मध्ये त्याच्या संघाचे नेतृत्व करत आहेत. बाबरच्या नेतृत्वात पाकिस्तानने विश्वचषकाची सुरुवात खूपच निराशाजन केली आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पाकिस्तानला भारत आणि झिम्बाब्वेकडून पराभव स्वीकारावा लागाला आहे. यादरम्यान बाबरचे वौयक्तिक प्रदर्शन देखील निराशाजन होते. आता याच पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू स्टुअर्ट लॉ यांना बाबर आझमविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तान संघ आशिया चषका 2022 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला होता. पण अंतिम सामन्यात त्यांना श्रीलंका संघाने पराभवाची धूळ चारली. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 मध्येही त्यांच्याकडून पाकिस्तानकडून अशाच प्रदर्शनाची होती. परंतु, तसे होताना दिसत नाहीये. भारताविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानने 4 विकेट्सने पराभव स्वीकारला, तर गुरुवारी (27 ऑक्टोबर) झिम्बाब्वेविरुद्ध एवघी एक धाव कमी पडल्यामुळे त्यांना सामना जिंकता आला नाही. या खराब प्रदर्शानंतर बाबर आझमच्या नेतृत्वावर देखील अनेकजण टीका करत आहेत. परंतु ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज स्टुअर्ट लॉ (Stuart Law) यांच्या मते बाबर पुढचे 5 ते 10 वर्ष पाकिस्तान संघाचे नेतृत्व करत राहील.
पाकिस्तान संघाला टी-20 विश्वचषकातील पुढच्या फेरीत जाण्यासाठी आता एकही सामना मगावून चारणार नाही. पढच्या सर्व सामन्यांमध्ये जर पाकिस्तानने विजय मिळवला, तर कुठे त्यांना उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचता येऊ शकते. कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या चांगले प्रदर्शन करत नसला, तरी त्याने संघासाठी दिलेले योगदान बहुमूल्य आहे. तसेच बाबर आझमव्यतिरिक्त संघात दुसरा कोणता खेळाडूही दिसत नाही, जो संघाचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतो. मोहम्मद रिजवान ही जबाबदारी सांभाळू शकतो, पण स्टुअर्ट लॉ यांच्या मते त्याला संघाचा कर्णधार बनवणे योग्य निर्णय नसेल.
माध्यमांशी बोलताना माजी ऑस्ट्रेलियन दिग्गज म्हणाले, “तुम्ही कर्णधाराच्या रूपात मोहम्मद रिजवानकडे पाहता, पण मला वैयक्तिक असे वाटते की, यष्टीरक्षकाकडे नेतृत्व दिले नाही पाहिजे. कारण त्याच्यावर आदीच खूप दबाव असतो. यष्टीरक्षकाचे काम खूप कठीण असते आणि त्याच्यासाठी संघाचे नेतृत्व करणे अजूनच अवघड असते. संघातून बाहेर असलेल्या एखाद्या खेळाडूला किंवा बेंचवरील एखाद्या खेळाडूला आजमावले जाऊ शकते. असे असले तरी, माझ्या मते बाबर आझम अजून पाच ते दहा वर्ष पाकिस्तान संघाच्या कर्णधारपदावर कायम राहील.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
न्यूझीलंडच्या ताफ्यात धाकड फलंदाजाची एंट्री! सुपर 12च्या पहिल्या ग्रुपमध्ये संघांचे वाजणार बारा
सामना रद्द झाल्याने गुणतालिकेत तळाशी असलेल्या ऑस्ट्रेलियाला फायदा, थेट ‘या’ स्थानावर घेतली उडी