मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल 2023मध्येही रोहितचे प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. अशात त्याच्यावर टिका करणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहित शर्माची पाठराखन केली.
रविवारी (21 मे) रोहितच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने होते. दोन्ही संघांचा लीग स्टेजमधील हा अंतिम सामना होता. सोबतच प्लेऑफमध्ये जागा पक्की करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे असलेली शेवटची संधीही होती. अशात या सामन्याआधी रवी शास्त्रींनी रोहित शर्मा () याच्याकडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा केली. सोबतच त्याला चांगल्या प्रदर्शनासाठी कुठल्याच मोटिव्हेशनची गरज नसल्याचेही सांगितले.
भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यात रोहित शर्माचे नशीब खराब असल्यामुळे सध्या त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. एका कार्यक्रमात बोलताना शास्त्रींनी याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “रोहित शर्मा कुठल्याच मोटिवेशनची गरज नाहीये. हे त्याचे खराब नशीब म्हणावे लागेल की, त्याच्या बॅटमधून धावा येत नाहीयेत. तो दोन-तीन चेंडू खेळून विकेट गमावत आहे. पण एकदा तो धावा करू लागला, तर त्याला रोखणे कठीण होते. तो वेगळ्याच प्रकारचा खेळाडू आहे.”
दरम्यान, रोहित शर्मा याने आयपीएलचा चालू हंगामात 13 सामन्यांमध्ये 257 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 19.76च्या सरासरीने धावा आल्या. मुंबईचे हंगामातील प्रदर्शन पाहिले, तर पहिल्यात 13 पैकी 7 सामने मुंबईने जिंकले आहेत. रविवारच्या सामन्याआधी मुंबई गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. (Backing up Rohit Sharma in poor form from Ravi Shastri)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीच्या आयपीएल निवृत्तीवर ऋतुराज गायकवाडचा मोठा गौप्यस्फोट, काय म्हणाला वाचाच
ही तर हद्दच! बसमध्ये जात असतानाच चाहत्याने रोहितला मागितली किस, पाहा काय होती ‘हिटमॅन’ची रिऍक्शन