भारताचा ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया हा सातत्याने चर्चेत असतो. मागील वर्षी टोकियो ऑलम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकल्यानंतर त्याने यावर्षी बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. सामाजिक कामातही नेहमीच आघाडीवर असणाऱ्या बजरंगने पुन्हा एकदा तसेच काम करत सर्वांचे मन जिंकले आहे.
बजरंग पुनिया आणि भारताचा वेटलिफ्टर गौरव शर्मा यांनी नुकतेच दिल्ली येथील जंतरमंतर या ठिकाणी गरजू लोकांना खाण्याची पाकीट तसेच पाणी वाटप केले. बजरंग याने यापूर्वी अशाच प्रकारे अनेकांची मदत केली होती. तो शेतकरी आंदोलनातही सक्रिय सहभागी झाला होता.
Olympic medallist Bajrang Punia, Powerlifter Gaurav Sharma distribute food to needy in Delhi.@BajrangPunia @FoundationPunia #bajrangpunia #bajrangpuniafoundation pic.twitter.com/kktiIuWDgo
— Bajrang Punia Foundation (@FoundationPunia) October 10, 2022
या कामाची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बजरंग म्हणाला,
“गरजू लोकांची मदत करणे मला नेहमीच आवडते. मी तर म्हणेल की सर्वांनी अशा लोकांना मदत करायला पाहिजे. कामांमध्ये लोकांनी सहभागी होणे गरजेचे आहे.” बजरंगने यावेळी गौरवचे देखील कौतुक केले. तो म्हणाला,
“गौरव केवळ आत्ताच नव्हे तर लॉकडाऊनच्या काळापासून असे सत्कार्य करतोय. यापूर्वी देखील आम्ही दोघांनी अशा प्रकारे मदत केली माझ्या मते मानवता सर्व गोष्टींच्या वर असायला हवी.”
गौरव शर्मा याने याबाबतीत प्रतिक्रिया देत म्हटले,
“बजरंग मला समर्थन करतोय याचा खरंच आनंद होतो. मी पहिल्या लॉकडाऊनपासून अशाप्रकारे लोकांना खाण्याची पाकिटे देत आलोय. देशातील क्रमांक एकचा कुस्तीपटू ज्यावेळी मदत करतो त्यावेळी आणखी कार्य करण्याची प्रेरणा मिळते.”
बजरंग पुनिया हा सध्या भारतातील सर्वात प्रसिद्ध कुस्तीपटू आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व पदके घेताना आपल्या नावे केले आहेत. नुकतेच त्याने जागतिक कुस्ती स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘भावा त्याने 700 गोल केलेत, रन नाही’, रोनाल्डोला शुभेच्छा देऊन युवराजने मारली स्वत:च्या पायावर कुऱ्हाड
‘काहीतरी करूनच ये, नाहीतर…’, शाहबाजच्या वडिलांनी दिली होती क्रिकेटपटूला ताकीद, आता सगळीकडं गाजतोय