बांगलादेश संघाने अष्टपैलू मेहिदी हसन मिराज याच्या शतकाच्या जोरावर बुधवारी (दि. 07 डिसेंबर) भारतीय संघापुढे मोठे आव्हान उभे केले होते. हे आव्हान पार करण्यात भारतीय संघ अपयशी ठरला आणि सामना बांगलादेशच्या पारड्यात पडला. या विजयामुळे बांगलादेशने मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. हसनने भारताविरुद्ध केलेले हे त्याच्या कारकीर्दीतील पहिलेच वनडे शतक होते. त्याने 83 चेंडूंचा सामना करताना 4 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 100 धावा केल्या. या विजयानंतर हसनने मोठे वक्तव्य केले.
काय म्हणाला मेहिदी हसन?
आव्हान उभे करण्याबद्दल बोलताना मेहिदी हसन (Mehidy Hasan) म्हणाला की, “आमच्या डोक्यात लक्ष्य निश्चित नव्हते. आम्ही 6 विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा हा विचार होता की, किती धावा करता येतील? आम्ही एकेवेळी एक चेंडू खेळत होतो. आम्ही छोट्या छोट्या भागीदारी करण्याचा निश्चय केला आणि लक्ष्य तयार करण्याचा विचार केला नाही. आम्ही स्थितीनुसार खेळलो आणि एकमेकांशी सातत्याने बोलत होतो.”
Walking in at 69/6 and coming back with an unbeaten century!
A record day for Mehidy Hasan 👉 https://t.co/7P4ZSPML2K pic.twitter.com/16uibaAl5W
— ICC (@ICC) December 8, 2022
हसनने सांगितले की, महमुदुल्लाह (Mahmudullah) हा वरिष्ठ खेळाडू असूनही त्याच्या गोष्टी ऐकत होता. मेहिदी म्हणाला की, “मला चांगले वाटले की, वरिष्ठ असूनही त्याने माझा आदर केला. तो माझे ऐकत होता, जेव्हा मी लक्षात आणून दिले की, तो गोंधळात पडतोय. मी त्याला अनेकदा सांगितले की, आक्रमण करू नको आणि सामन्याला आणखी पुढे घेऊन जायचे आहे. छोट्या छोट्या चर्चांमुळे आमच्या भागीदारीमध्ये फायदा झाला.”
आपल्या शतकाबद्दल बोलताना मेहिदी हसन म्हणाला की, “हा माझ्यासाठी शानदार क्षण आहे की, मी माझे पहिले वनडे शतक झळकावले. मी हा क्षण कधीही विसरणार नाही. आम्ही अडचणीत होतो. महमुदुल्लाह भावासोबत माझी भागीदारी महत्त्वपूर्ण होती. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण, भारत जगातील सर्वोत्तम संघांपैकी एक आहे. मोठ्या संघाविरुद्ध चांगले प्रदर्शन करणे नेहमीच शानदार असते. आम्ही भारताविरुद्ध दुसरा वनडे सामना जिंकलो. मी चांगले प्रदर्शन करण्याची कोणतीही योजना आखली नव्हती. माझ्या नशिबाचा मला आधार मिळाला.”
पुढे बोलताना मेहिदी म्हणाला की, “मला कधीच विश्वास नव्हता की, मी शतक करू शकेल. मी संघासाठी खेळत होतो आणि लयीत होतो. मला संपूर्ण 50 षटके खेळायचे होते. तसेच, अपेक्षा होती की, 240-250 धावसंख्या उभारू, ज्याचा पाठलाग करताना भारताला कठीण जाईल.”
मेहिदी हसन याने अनुभवी महमुदुल्लाह याच्यासोबत 148 धावांची भागीदारी रचली. या दोघांच्या खेळीमुळे बांगलादेशने भारतापुढे 271 धावांचा भलामोठा डोंगर उभा केला होता. हे आव्हान पार करताना भारतीय संघाने 9 विकेट्स गमावत फक्त 266 धावा केल्या. त्यामुळे हा सामना बांगलादेशने 5 धावांनी जिंकला. ( ban vs ind 2nd odi 2022 mehidy hasan miraz says beat india because small talks with mahmudullah)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सलामीला खेळवा, नाहीतर तळात; शर्माजींचा पोरगा सगळीकडेच ठरतोय ‘हिटमॅन’, नुसता पाडलाय षटकारांचा पाऊस
सामना गमावला, पण श्रेयस अय्यरने करून दाखवला नाद पराक्रम; विराट अन् धोनीला पछाडत बनला अव्वल फलंदाज