आशिया चषक 2023 च्या सुपर फोर फेरीतील पहिला सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. बुधवारी (6 सप्टेंबर) या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याला दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले. पाकिस्तानला आपला पुढचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध खेळायचा असून नसीमच्या दुखापतीमुळे संघाची चिंता वाढली आहे.
बुधवारी (6 सप्टेंबर) पाकिस्तान आणि बांगलादेश संघ लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर आमने सामने आहेत. पाकिस्तानने नाणेफेक गमावल्यामुळे संघालाल प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण त्यांचा वेगवान गोलंदाज नसीम शाह (Naseem Shah) यादरम्यानच दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षण करताना नसीम मैदानात जोरात पडला, ज्यामुळे त्याला सामन्यादरम्यान मैदान सोडावे लागले. चाहते आणि संघ व्यवस्थापनासाठी त्याची ही दुखापत चिंताजनक ठरू शकते. सुपर फोरमधील तिसरा आणि आशिया चषक 2023 मधील एकूण 10वा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. 10 सप्टेंबर रोजी होणाऱ्या या सामन्यात नसीम पाकिस्तानसाठी महत्वाचा खेळाडू ठरू शकतो.
Naseem Shah, yaar nahi karo. Super Four round hay and matches against India to come too. Please recover 😔🙏🏼 #AsiaCup2023 pic.twitter.com/ZeG0ITESTx
— Farid Khan (@_FaridKhan) September 6, 2023
ग्रुप स्टेजमध्ये भारत आणि पाकिस्तान संघ आमने सामने आला, तेव्हा नसीमने अप्रतिम प्रदर्शन केले होते. त्याने 8.5 षटकात 36 धावा खर्च करून 3 विकेट्स घेतल्या होत्या. पण पावसामुळे हा सामना निकाली लागला नाही. अशात आशिया चषकात भारताविरुद्ध दुसऱ्यांदा संधी मिळाल्यानंतर वेगवान गोलंदाज पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करताना दिसू शकतो. मात्र, बुधवारी (6 सप्टेंबर) झालेल्या दुखापतीमुळे याबाबत कुठलीच खात्री देता येणार नाही. लवकच पाकिस्तान संघाकडून त्याच्या दुखापतीविषयी अधिकृत माहिती समोर येऊ शकते. (Naseem Shah left the field due to injury)
पाकिस्तान विरुद्ध बांगलादे सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन –
पाकिस्तान – फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अश्रफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हॅरिस रौफ.
बांगलादेश संघ – मोहम्मद नईम, मेहिदी हसन मिराझ, लिटन दास, तौहिद हृदोय, शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), शमीम हुसेन, अफिफ हुसैन, तस्किन अहमद, शोरीफुल इस्लाम, हसन महमूद.
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या माजी खेळाडूचे वक्तव्य, म्हणाला, ‘आपण ईशान आणि राहुलबद्दल खूप बोलतोय पण श्रेयस…’
Asia Cup 2023: सुपर- 4मधील पहिल्या सामन्यात बांगलादेश ‘टॉस का बॉस’, पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11