सध्या बांगलादेशचा संघ 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. त्यातील पहिला सामना रावलपिंडी मैदानावर खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानवर 10 गडी राखून विजय मिळवला. बांगलादेशनं कसोटीमध्ये पाकिस्तानला पहिल्यांदाच पराभूत केलं आणि ऐतिहासिक विजय मिळवला. या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे, असे पीसीबीच्या प्रमुखांनी हे सूचित केलं.
मीडियाशी बोलताना पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी (mohsin naqvi) म्हणाले, “मी पाकिस्तान क्रिकेट आणि पाकिस्तान क्रिकेटमधील समस्या बदलणार आहे. नक्वीनं विश्वचषकात पाकिस्तान क्रिकेटमध्ये मोठा बदल घडवून आणल्याची आठवण करून दिली.” जेव्हा पाकिस्तानी संघ टी20 विश्वचषकातून बाहेर पडला होता, पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाल्यानंतर नक्वी म्हणाले, “सुरुवातीला मला असे वाटले की हा छोटासा बदल पुरेसा असेल, परंतु या खराब कामगिरीनंतर हे स्पष्ट आहे की मोठा बदल आवश्यक आहे. लवकरच देशाच्या क्रिकेटमध्ये मोठे बदल होतील.”
पुढे बोलताना नक्वी म्हणाले की, “माझे शब्द लक्षात ठेवा की या गोष्टी एकसारख्या राहणार नाहीत. आपली घरच्या मैदनावरची परिस्थिती कशी समजू शकत नाही? आपण या प्रकारच्या खेळपट्टीवर 4 वेगवान गोलंदाज खेळवतो, जे अस्वीकार्य आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
निवृत्तीच्या अवघ्या दोन दिवसानंतर शिखर धवन मैदानावर परतला! या मोठ्या स्पर्धेत खेळताना दिसणार
टी20 विश्वचषकादरम्यान आर्थिक नुकसान झालं, ‘स्टार स्पोर्ट्स’नं आयसीसीकडे मागितली कोट्यवधी रुपयांची सवलत!
राहुल द्रविडच्या मुलाचा फ्लॉप शो जारी, बंगळुरूविरुद्ध संघाचा एकतर्फी पराभव