पोचेफस्टरूम। दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात गुरुवारी(6 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील बांगलादेश संघाने 19 वर्षांखालील न्यूझीलंड संघाचा उपांत्य सामन्यात 6 विकेट्सने पराभव केला आणि पहिल्यांदाच अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
त्यामुळे आता 9 फेब्रुवारीला होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात बांगलादेश समोर 4 वेळच्या विश्वविजेत्या भारतीय संघाचे आव्हान असणार आहे. 19 वर्षांखालील भारतीय संघाने मंगळवारी(4 फेब्रुवारी) 19 वर्षांखालील पाकिस्तान संघाला पराभवाचा धक्का देत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
गुरुवारी झालेल्या बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड संघातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 211 धावा करत बांगलादेश समोर 212 धावांचे आव्हान ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशकडून महमुदुल हसन जॉयने 127 चेंडूत 100 धावांची शतकी खेळी केली. तसेच तोव्हिद ह्रिदोय आणि शहादत हुसेनने प्रत्येकी 40 धावांची खेळी केली. त्यामुळे या तिघांच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने 212 धावांचे आव्हान 44.1 षटकात 4 विकेट्स गमावत सहज पार केले.
यावेळी न्यूझीलंडकडून क्रिस्टिन क्लार्क, कर्णधार जेसी ताशकोफ, अदित्य अशोक आणि डेव्हिड हँकॉकने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून बेकहॅम व्हीलर-ग्रीनलने सर्वाधिक नाबाद 75 धावांची खेळी केली. तसेच निकोल्स लिडस्टोनने 44 धावांची खेळी केली. मात्र अन्य फलंदाजांना मोठ्या धावसंख्या उभारण्यात अपयश आले. त्यामुळे न्यूझीलंडला 50 षटकात 8 बाद 211 धावा करता आल्या.
बांगलादेशकडून शोरिफूल इस्लामने सर्वाधक 3 विकेट्स घेतल्या. तसेच शमीम हुसेन आणि हसन मुरादने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तर रकिबूल हसनने 1 विकेट घेतली.
…आणि पाकिस्तान विरुद्ध १० विकेट्स घेणाऱ्या अनिल कुंबळेचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले
वाचा👉https://t.co/wfy3qf43N2👈#OnThisDay @anilkumble1074 #म #मराठी #Cricket #TeamIndia— Maha Sports (@Maha_Sports) February 7, 2020
भारताचा हा खेळाडू 'जादूगार'- इयान बिशप
वाचा- 👉https://t.co/6maiB9jqGy👈#म #मराठी #Cricket #engvssa— Maha Sports (@Maha_Sports) February 6, 2020